घरट्रेंडिंग९ वर्षाचा इंजीनियर कधी पाहिलाय? तर पाहा

९ वर्षाचा इंजीनियर कधी पाहिलाय? तर पाहा

Subscribe

लॉरेंट सायमन नावाचा ९ वर्षाचा मुलगा डिसेंबरमध्ये इंजीनियरची डिग्री मिळवून जगातील सर्वात छोटा पदवीधर होणार.

इंजिनिअरिंगची डिग्री जरी चार वर्षांची असली तरी लोकांना केटीमुळे ती पूर्ण करे पर्यंत ४ ते ६ वर्ष लागतातच. पण लॉरेंट सायमन नावाचा मुलगा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री चक्क वयाच्या नव्या वर्षात मिळवणार आहे. हा छोटा आईनस्टाईन अर्धा बेल्जियन आणि अर्धा डच असून नेदरलँड्सच्या एनधोव्हन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकत आहे. एका सामान्य माणसाची बौद्धिक पातळी (IQ level) ९० ते ११० पर्यंत असते आणि १२० वरील बौद्धिक पातळी श्रेष्ठ मानली जाते. तर लॉरेंटची बौद्धिक पातळी ही चक्क १४६ आहे. वयानं जरी लॉरेंट ९ वर्षांचा असला तरी त्याची बुद्धी ही त्याच्या वयापासून फार जास्त आहे.

इंजिनिअरिंगच्या डिग्रीसाठी लॉरेंट त्याच्या कॉलेजमधील सगळ्यात लहान विद्यार्थी आहे. एका मुलाखतीत लॉरेंटचे वडील म्हणाले की, लॉरेंटला पुढे जाऊन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी करायची आहे आणि त्यासोबत मेडिसिनमध्ये देखील डिग्री मिळवायची आहे. अनेक विद्यापीठ देखील लॉरेंटची नोंदणी करण्यास तयार आहेत. मात्र लॉरेंटच्या पालकांना त्याच्या कमी वयात आणि त्याच्या या अजब क्षमतेत एक संतुलन ठेवायचं आहे. त्याच्या विद्यापीठातील शिक्षक देखील त्याच्या बुद्धीचं फार कौतुक करतात. ते म्हणतात की, लॉरेंट हुशार असून फार सोज्वळ देखील आहे.

- Advertisement -

लॉरेंटच्या आईनं एका मुलाखतीत सांगितलं की, त्याच्या आजी आजोबानं त्याच्यातील हा अनोखा गुण सर्वात आधी ओळखला होता. ‘जगातील सर्वात तरुण पदवीधर’ ही पदवी सध्या मायकल केर्नी नावाच्या मुलाकडे आहे मात्र पुढच्या महिन्याच लॉरेंट ही पदवी मायकल कडून घेणार. मायकल हा युनिव्हर्सिटी ऑफ अलबामामधून १० वर्षाचा असताना पदवीधर झाला.

- Advertisement -

 

हेही वाचा: ‘मिर्झापूर २’चा टीझर प्रदर्शित!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -