घरट्रेंडिंगजागतिक पुस्तक दिवस आणि चेतन भगत

जागतिक पुस्तक दिवस आणि चेतन भगत

Subscribe

आज जागतिक पुस्तक दिन. मराठीत एक म्हण आहे ‘वाचाल तर वाचाल’. मात्र आज वाचणाऱ्यांची संख्या कमी झालू असून बघणाऱ्यांची संख्या वाढली आहे. म्हणजे आता पुस्तकाऐवजी दृष्य माध्यमाला तरुणाई अधिक महत्त्व देताना दिसते. मात्र यातही तरुणाईला एका माणसाने पुस्तकांचे वेड लावले तो माणूस म्हणजे चेतन भगत. त्याच्या पुस्तकांना साहित्याचे अंग किती? याबद्दल काहीजण प्रश्न उपस्थित करतील. मात्र चेतनने तरूणाईला हातात पुस्तक घ्यायला भाग पाडले. २२ एप्रिल हा चेतन भगतचा जन्मदिन तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी जागतिक पुस्तक दिन हा देखील एक योगायोगच आहे.

World Book Day च्या निमित्ताने आपण या तरुण लेखकाच्या लिखाणाचा मागोवा घेत आहोत. आजच्या तरुणाईला चित्रपटाची भाषा अधिक भावते. चेतन भगत हा असा एकमेव लेखक आहे, ज्याच्या पुस्तकावर आतापर्यंत अनेक चित्रपट आलेले आहेत. मग तो फाईव पॉईंट समवन असेल, हाल्फ गर्लफ्रेंड किंवा टू स्टेट्स असेल.. अशा पुस्तकांवर आधारीत चित्रपटांमध्ये आघाडीच्या कलाकारांनी काम केलेले आहे.

चेतन भगत यांची पुस्तके

- Advertisement -

 

- Advertisement -

चेतन भगतने आयआयटी मधून शिक्षण घेतलेले आहे. त्यानंतर एमबीए ही केले. मात्र तरिही तो लेखक झाला. समकालिन तरुणाईला आकर्षित करेल, असे विषय घेऊन त्याने लिखाण सुरु केले. चेतनची पुस्तके मोठ्या बुक स्टोअरपासून रेल्वे स्टेशन आणि फुटपाथवर देखील उपलब्ध असतात आणि सर्वठिकाणी त्या पुस्तकांना मागणीही प्रचंड असते. लोकप्रिय पुस्तक लिहिण्यात त्याचा चांगलाच हातखंडा आहे. आपल्या साहित्य परिषद, साहित्य समेलंनातून मोठ मोठे लेखक, दर्जेदार साहित्य निर्माण करणारे लेखक आहेतच. मात्र चेतनचा बेस्ट सेलर टॅग सर्वांनाच मिळत नाही. तो चेतनेच कमावला आहे.

https://www.mymahanagar.com/trending/world-book-day/88083/

चेतनच्या बेस्ट सेलर पुस्तकांमुळे वाचकांचे आणि साहित्याचे नुकसान झाले असल्याची खंत अनेकजन बोलून दाखवतात. मात्र त्याने वाचणाऱ्याचे काही नुकसान होणार आहे का? हा देखील प्रश्न आहे. चेतन जर दर्जेदार लेखक नसेल तर मराठीत असे लेखक निर्माण होण्यासाठी प्रयत्न का झाले नाहीत. म्हणायला सुदिप नगरकर आहे. मात्र तोही इंग्रजीत लिखाण करत असल्यामुळे मराठी भाषेत बेस्ट सेलर तरुण लेखक निर्माण झालेला नाही.

चेतनने काही दिवसांपूर्वी आपल्या नव्या पुस्तकाची घोषणा केली आहे. ‘दि गर्ल इन रूम १०५ – अॅन अनलव्ह स्टोरी’ या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी चेतने नवीन फंडा काढलाय. ज्याप्रमाणे चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला जातो. तसा ट्रेलर चेतनच्या पुस्तकासाठी प्रदर्शित करण्यात आला आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -