फटाक्याच्या कचर्‍याने भरला अमेरिकेतील इंडिया स्क्वेअर

दिवाळीच्या उत्सवानंतर न्यू जर्सी मधील इंडिया स्क्वेअर कचऱ्याने भरला, व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल.

Usa
India Square in New Jersey post Diwali celebrations
दिवाळीच्या उत्सवानंतर न्यू जर्सी मधील इंडिया स्क्वेअर

दिवाळीचा सण हा रोषणाईने साजरा केला जातो. प्रत्येक भारतीय हा सण साजरा करण्यासाठी फार उत्सुक असतो. मग आपण भारतात असो किंवा  परदेशात, हा सण साजरा करायचा हे मात्र नक्की. पण काही भारतीय बांधवांनी हा सण न्यू जर्सी मधील इंडिया स्क्वेअरमध्ये साजरा केला. भारतीयांनी दिवाळी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला मात्र परदेशातील रस्त्याची दूरावस्था केल्याचे चित्र बघायला मिळाले. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वायरल झाला आहे. या व्हिडीओत इंडिया स्क्वेअरवरमध्ये जमलेला कचरा साफ करण्यासाठी अनेक हायड्रंट्सद्वारे पाण्याचे फवाऱ्याच्या सहाय्याने हा रस्त्यावर जमलेला फटाक्याच्या कागदाचा कचरा साफ करण्यात येत आहे.

फटाक्याचे रिकामे बॉक्स, फटाक्यांचे रॅपर्स आणि इतर प्रकारच्या कचऱ्याने अमेरिकेतील इंडिया स्क्वेअरचा रस्ता भरलेला दिसत आहे. ही साफसफाई पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केल्याचे देखील या व्हायरल व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहे. तसेच या भागात झालेल्या फटाक्याचा कचरा आणि झालेल्या प्रदूषणाचा कोणताही परिणाम काही लोकांना झालेला देखील दिसत आहे. दरम्यान याठिकाणी सुरू असणारी साफसफाई आणि इतर कामावर लक्ष ठेवण्यासाठी न्यू जर्सीच्या पोलीस सज्ज असून त्या परिसरात गस्त घातली.

संध्या नावाच्या एका ट्विटर युजरने हा १४ सेकंदाचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आणि त्यावर असं वाक्य लिहीलं, “भारतीय म्हणवून घ्यायला लाज वाटत आहे. जर्नल स्क्वेअर न्यू जर्सीजवळ इंडियन स्ट्रीटवरील गेल्या रात्रीचं हे दृश्य. या गोंधळाला अगदी चोखपणे हातळल्या बाबत एनजे पोलिसांना माझा सलाम.”

हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला असून, या व्हिडीओला १५,००० पेक्षा जास्त व्यूज मिळाले. या घटनेबाबत लोकांनी फार चर्चा करून त्यांचा संताप व्यक्त केला. ‘विकसित देशांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सर्व भारतीयांना स्वच्छतेवरचे कठोर शिबिर घ्यायला पाहिजे.’ यांच्या सारखे अनेक लोकांनी त्यांचा राग ट्विटरवर दर्शवला आहे.