घरट्रेंडिंगआम्ही सुद्धा शहरी नक्षलवादी! #MeTooUrbanNaxal ट्विटरवर ट्रेडिंगमध्ये

आम्ही सुद्धा शहरी नक्षलवादी! #MeTooUrbanNaxal ट्विटरवर ट्रेडिंगमध्ये

Subscribe

जे लोक शहरी नक्षलवादाचे समर्थन करतायत अशा तरुणांची मी यादी बनवत आहे. तुम्हीही समर्थन करत असाल तर माझ्याकडे नावे द्या, असे ट्विट करुन चित्रपट निर्माता आणि लेखक विवेक अग्निहोत्री यांनी एकच खळबळ उडवून दिली. त्यांच्या ट्विटनंतर ट्विटरवर आता #MeTooUrbanNaxal अशी डिजीटल चळवळ आज ट्रेडिंगमध्ये आली आहे. २८ ऑगस्ट रोजी अग्निहोत्री यांनी हे ट्विट केले होते. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी काल पाच लोकांची अटक झाली, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट केले होते. त्यानंतर अनेक लोक आता पुढे येऊन आम्ही सुद्धा नक्षलवादी असल्याचे सांगत आहेत.

- Advertisement -

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेली एल्गार परिषद आणि दुसऱ्या दिवशी भीमा कोरेगाव येथे उसळलेला हिंसाचार.. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्र पोलिसांनी देशभरात पाच ठिकाणी छापे टाकून पाच लोकांची अटक केली होती. अटकेच्या निषेधार्थ आज ट्विटरवर #MeTooUrbanNaxal हा हॅशटॅग चालवला जात आहे. पोलिसांचे हे अटकसत्र अन्यायकारक असून नाझीवादाप्रमाणे ही हुकूमशाही असल्याची टीका नेटिझन्स करत आहे.

फेक न्युजचा पर्दाफाश करणारे अल्ट न्युज या वृत्तसंस्थेचे प्रमुख प्रतीक सिन्हा यांनी विवेक अग्निहोत्री यांना पांठिबा देत इतरांनीही या कॅम्पेनमध्ये उतरण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातूनही निखील वागळे, अनेक पत्रकार, विचारवंतांनी या हॅशटॅग कॅम्पेनला पाठिंबा दिला आहे.

- Advertisement -

पत्रकार संध्या मेनन यांनीही ट्विट करत म्हटले की, जर तुमची यादी संपली नसेल तर माझे नाव यादीत समाविष्ट करा.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी सुद्धा ट्विट करत या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, जर सुधा भारद्वाज नक्षलवादी आहेत, तर मी देखील नक्षलवादी आहे. मला अटक करा.

पत्रकार सागरीका घोष यांची टीका

लेखक विवेक अग्निहोत्री यांचे ‘अर्बन नस्कल’ या नावाने पुस्तक प्रकाशित झालेले आहे. या पुस्तकावरच आधारीत ‘बुद्धा इन ट्राफिक जाम’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झालेला होता. त्यामुळे #UrbanNaxal हा हॅशटॅग वापरून अग्निहोत्री स्वतःच्या पुस्तकाचे प्रमोशन करत तर नाहीत ना? असाही आरोप काही लोकांनी केला आहे. पत्रकार सागरीका घोष यांनी ट्विट करत अग्निहोत्री यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

5 प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -