Ayodhya Verdict : व्हॉट्सअॅप ग्रुप झाले सतर्क आणि केली ‘ही’ गोष्ट

अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला नसून या निकालावर व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिने सतर्कता पाळली आहे.

Mumbai
whatsapp feature know how to change chat text format in typewriter font
असं करा आणि व्हॉट्सAPP चॅटिंगमध्ये 'टाइपरायटर फॉन्ट'ची मज्जा घ्या

अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर देशभरातून अनेक मान्यवरांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेक ठिकाणी या निकाल्याच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे अनेकदा कोणतीही गोष्ट घडली की, ती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरते. परंतु, अयोध्ये निकाला नंतर सोशल मीडिया थंड असल्याचे दिसून येत आहे.

…यामुळे सोशल मीडिया थंड

अयोध्ये निकालाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची अफवा पसरु नये. तसेच कोणतेही एसएमएस, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होऊ नये याकरता पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. अनेक ठिकाणी पोलिसांकडून याची जाहीर नोटीस देखील काढण्यात आली आहे. तसेच एखाद्या ग्रुपवर जर कोणी राम मंदिराबाबत पोस्ट टाकल्यास त्या ग्रुपमधील सदस्याचे नाव तात्काळ पोलीस स्थानकात कळवावे, असे देखील त्या नोटीसद्वारे सांगण्यात आले आहे. याची दक्षता घेत बऱ्याच ग्रुप अॅडमिनने ग्रुपमधील इतर सदस्यांना लॉक करुन फक्त स्वत: संदेश पाठवू शकतील अशी सेटिंग केली आहे. त्यामुळे एखाद्या ग्रुपमध्ये तशी सेटिंग केल्यामुळे अफवा पाठवण्यास आळा बसला आहे.

प्रक्षोभक संदेश पसरवू नका

ज्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रक्षोभक संदेश पसरविले जातील, त्या ग्रुपच्या अ‍ॅडमिनवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे संदेश पसरवू नका, असे शहर सायबर शाखेचे पोलीस अधीक्षक देवराज बोरसे यांनी सांगितले.

संबंधितावर होणार कारवाई

ग्रामीण सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष अन्मुलवार यांनी असे सांगितले की, ‘जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ग्रामीण सायबर शाखा फेसबुक, हॉट्सअ‍ॅपवर करडी नजर ठेवून आहे. प्रक्षोभक संदेश, चित्र अपलोड केल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ संबंधितावर कारवाई केली जाणार आहे.’

चोख शहर पोलीस बंदोबस्त

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपायुक्त चार, सहायक आयुक्त आठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक १५, पोलीस कर्मचारी दोन हजार, होमगार्ड, शीघ्र कृतीदल, दंगानियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल. जिल्हा पोलीस बंदोबस्त – पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक दोन, पोलीस उपअधीक्षक आठ, पोलीस निरीक्षक ३०, पोलीस उपनिरीक्षक ८०, पोलीस कर्मचारी २ हजार ५००, होमगार्ड ४००.


हेही वाचा – प्रक्षोभक संदेश पाठवणार्‍या व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनवर होणार कारवाई