घरमुंबईमुंबईसह पालघरला मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईसह पालघरला मुसळधार पावसाचा इशारा

Subscribe

शुक्रवारी मुंबईसह पालघरला मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

मुंबईत दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.‌ अनेक ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी झाल्या असल्याची नोंद करण्यात आली. मुंबई उपनगरात ४.१ तर शहरात १०.२ मिमी एवढा पाऊस झाला. तर, शुक्रवारी मुंबईसह पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पण मंगळवारच्या तुलनेत पावसाला जोर नसेल

मात्र मंगळवारच्या पावसाएवढा हा पाऊस मुसळधार नसण्याची शक्यता वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह पालघरच्या परिसरात मुसळधार पाऊस होईल, अशी माहिती वेधशाळेने दिली आहे. दरम्यान, राज्यातील नैर्ऋत्य मोसमी पावसाची वाटचाल उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेशाच्या उर्वरित भाग तसेच राजस्थानच्या आणखी काही भागात सुरू झाली आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार तर कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडला आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. गोव्यासह कोकण किनारपपट्टीवर २ ते ७ सेंमी. एवढा पाऊस झाला आहे.

हेही वाचा – मालाड दुर्घटनाग्रस्तांना खासगी कंपन्यांकडून मोफत आरोग्य चाचण्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -