घरमहाराष्ट्रनाशिककाझीची गढी : अल्टिमेटम संपला

काझीची गढी : अल्टिमेटम संपला

Subscribe

काझीची गढी येथे विभागीय अधिकारी, अग्निशमन दल, अतिक्रमण निर्मूलन दल घटनास्थळी दाखल; पथकांची 'वेट अँड वॉच' भूमिका

जुने नाशिकमधील धोकादायक झालेली काझीची गढी येथे विभागीय अधिकारी, अग्निशमन दल, अतिक्रमण निर्मूलन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र घटनास्थळी या पथकांची ‘वेट अँड वॉच’ भूमिका बघता कारवाईची शक्यता धूसर दिसत आहे. त्यात अधूनमधून पावसाचाही व्यत्यय येत आहे आणि रात्री कारवाई करण्याबाबत साशंकता दिसत आहे. यापूर्वी प्राशासनाने शनिवारी(दि.६) दुपारी चार वाजेपर्यंत स्थलांतर करण्याचा अल्टिमेटम दिला होता. मनपा प्रशासनाने रहिवाश्यांना तात्पुरत्या स्वरूपात निवाऱ्याची व्यवस्था शहरातील बी.डी. भालेकर शाळा, गाडगे महाराज धर्मशाळा, चव्हाट्यामधील रंगारवाडा या महानगर पालिकांच्या शाळेत केलेली आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी मनपा उपायुक्त महेश डोईफोडे, अग्निशमन केंद्र अधिकारी राजेंद्र बैरागी, पश्चिम विभागीय अधिकारी अनिल नरसिंगे, प्रभारी शहर अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी गढीवर भेट देऊन रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आवाहन केले होते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -