घरमहा @२८८देवळी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ४५

देवळी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ४५

Subscribe

वर्धा जिल्ह्यात देवळी (विधानसभा क्र. ४५) विधानसभा मतदारसंघ आहे.

देवळी हे वर्धा जिल्ह्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगननेनुसार देवळीची लोकसंख्या १,५९,८७ इतकी आहे. देवळी विधानसभा मतदारसंघ हा विधानसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. या मतदारसंघात १९९९ पासून काँग्रेसची सत्ता आहे.

मतदारसंघ क्रमांक – ४५
मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या
पुरुष – १,२९,९९६
महिला – १,१८,४०३
एकूण मतदार – २,४८,४०

विद्यमान आमदार – रणजित प्रतापराव कांबळे, काँग्रेस

रणजित प्रतापराव कांबळे हे देवळीचे सध्या विद्यमान आमदार आहेत. रणजीत कांबळे हे वर्धातील मोठे नाव आहे. ते माजी राज्यमंत्री आहेत. रणजित कांबळे हे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, पर्यटन व सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी) राज्यमंत्री आहेत. १९९९ साली पहिल्यांदा त्यांनी देवळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही ते जिंकून आले आहेत.

- Advertisement -
mla ranjit kamble
विद्यमान आमदार रणजित कांबळे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) रणजित कांबळे, काँग्रेस – ६२,५३३
२) सुरेश वाघमारे, भाजप – ६१,५९०
३) उमेश म्हैस्कर, बसप – २४,९७३
४) शशांक घोडमारे, राष्ट्रवादी – ६,३४३
५) निलेश गुलहाने, शिवसेना – ४,६०९


हेही वाचा – ८ – वर्धा लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -