घरअर्थजगतरिझर्व्ह बँकेने रेपो दरात केली कपात; EMI होणार कमी

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केली कपात; EMI होणार कमी

Subscribe

रिझर्व्ह बँकेने केलेली ही रेपो दरातील चौथी कपात

रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये कपात केल्याने ईएमआय घटणार आहे. त्यामुळे कर्जाचे हफ्ते फेडणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. बुधवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहा सदस्यीय पत धोरण समितीने रेपो दरात ०.३५ टक्क्यांची कपात केली असून तो ५.४० टक्के केला आहे. तर रिव्हर्स रेपो दर ५.१५ टक्के केला आहे. रिझर्व्ह बँकेने केलेली ही रेपो दरातील चौथी कपात आहे.

- Advertisement -

पहिले रेपो दर हा ५.७५ टक्के होता, जो सप्टेंबर २०१० नंतरचा सर्वात कमी दर होता. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने तीन वेळा रेपो दर ०.७५ टक्के केला. यामुळे कर्ज स्वस्त होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -