घरमहाराष्ट्रनाशिककिल्ले रामशेजच्या सानिध्यात रमले पोलिस आयुक्तांसह शहरातील मान्यवर

किल्ले रामशेजच्या सानिध्यात रमले पोलिस आयुक्तांसह शहरातील मान्यवर

Subscribe

किल्ले रामशेजवर ऐतिहासिक आठवणींची अनुभूती

ऐतिहासिक घटना आणि शौर्याचे प्रतिक असलेल्या किल्ले रामशेजवरील विविध आठवणींची अनुभूती रविवारी (दि. २५) पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह त्यांचे कुटुंबिय, सहकारी व मित्र परिवाराने घेतली.किल्ले रामशेजवर सकाळी चढाई करत संपूर्ण परिसराच्या प्रसन्न वातावरणात सर्वजण रमले होते. दुर्ग संवर्धनाचे राम खुर्दळ व दुर्गमित्र किरण चव्हाण यांच्याकडून उपस्थितांनी इतिहास व येथील स्थळांची माहिती जाणून घेतली.

या भेटीदरम्यान पोलीस आयुक्तांसोबत डॉ. प्रदीप पवार, रतन लथ आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी
किल्ल्याच्या सर्व बाजूंच्या अभेद्य कांतीव कड्यांची, किल्ल्यावरील विविध वास्तू, वैविध्यपूर्ण टाके, सैनिकांचे सरदारांचे पडके वाडे, घरे, शस्रगार, चुन्याचा घाणा, टेहळणीचे बुरुज, गुप्तमार्ग, राम मंदिर, त्यामागील गुप्त मार्ग, तळे, गोमुखी दरवाजा, देवीमंदिर, किल्ल्याचे तट, गोमुखी भव्यद्वार, पूर्वेकडील दमदमा बांधणीचा डोंगर, मुख्य प्रवेशद्वार, शिलालेख आणि ऐतिहासिक, पर्यावरणीय महत्व समजून घेतले.

- Advertisement -

तीन तासांच्या सहवासात शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे किल्ले रामशेजवर चालणारे दुर्गसंवर्धन श्रमदानासंदर्भातील डॉक्युमेंटेशनबाबत आयुक्त नांगरे-पाटील यांना माहिती दिली. यावेळी शिवकार्य गडकोटतर्फे आयुक्त नांगरे-पाटील यांना ‘गडकोट आपुले जीव की प्राण’ ही पुस्तिका भेट देण्यात आली.

प्रत्येक महिन्याला दुर्गसंवर्धन मोहीम हाती घ्यावी. या उपक्रमाला पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होऊन मदत करतील, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले. इतिहासाचा साक्षीदार असलेल्या रामशेजच्या आठवणींची शिदोरी घेऊन सर्व परतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -