घरदेश-विदेशप्रचाराचा शेवटचा रविवार; महाराष्ट्रात दिग्गजांच्या सभांचा धडाका

प्रचाराचा शेवटचा रविवार; महाराष्ट्रात दिग्गजांच्या सभांचा धडाका

Subscribe

आज प्रचाराचा शेवटचा रविवार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या दिग्गजांच्या सभा महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आजचा रविवार हा शेवटचा रविवार आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेक लोक प्रचारसभांमध्ये जातात किंवा घरीबसल्या विविध माध्यमांतून प्रचारसभा बघत असतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आज खऱ्या अर्थाने निवडणुकीचे वातावरण बघायला मिळणार आहे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेते नितीन गडकरी, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यादेखील सभा होणार आहेत.

हेही वाचा – नरेंद्र मोदी,राहुल गांधी आज महाराष्ट्रात

- Advertisement -

अमित शहांच्या ४ तर नरेंद्र मोदींच्या २ सभा

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात दोन सभा होणार आहेत. त्यांची पहिली सभा जळगावमध्ये होणार आहे. त्यानंतर त्यांची दुसरी सभा राष्ट्रवादीचे नेते नाना पटोले यांच्या साकोली या मतदारसंघात होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या आज चार सभा होणार आहेत. या सभा कोल्हापूर, दक्षिण कराड, पुणे आणि औरंगाबाद येथे होणार आहेत. त्याचबरोबर राजनाथ सिंह यांचा गोरेगाव येथे रोड शो आयोजित करण्यात आला आहे. आज मीरा-भाईंदर येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

राहुल गांधींची महाराष्ट्रात पहिली सभा

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्यानंतरही काँग्रेसकडून केंद्रातील कोणत्याही ज्येष्ठ नेत्याकडून प्रचार होत नसल्याचे दिसत होते. अखेर आज शेवटच्या रविवारचे मुहूर्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मिळाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची आज महाराष्ट्रात पहिली सभा होणार आहे. आज मुंबई आणि लातूरमध्ये त्यांच्या सभा होणार आहेत.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्या ५ तर राज ठाकरे यांच्या २ सभा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यात त्यांच्या आज ५ सभा होणार आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईत २ सभा होणार आहेत. मुंबईतील मालाड आणि दहिसर येथे त्यांच्या सभा होणार आहेत.

शरद पवार यांच्या ४ सभा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज ४ सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यांची सकाळी अकरा वाजता अकोले, दुपारी २ वाजता जिल्ह्यातील घनसावंगी, संध्याकाळी ४ वाजता जळगावच्या जिल्ह्यातील जामनेर आणि चाळीगाव येथे सभा होणार आहे.

मुख्यमंत्र्यांची मॉर्निंग वॉकपासूनच प्रचाराला सुरुवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास ते नरिमन पॉईंट येथील मरीन ड्राईव्ह भागात गेले. तिथे त्यांनी लोकांशी संवाद साधत प्रचार केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आज पाच सभा होणार आहेत. त्यातील एक सभा ही मुंबईतील वर्सोवा येथे होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -