घरमहाराष्ट्रचाकणमध्ये कुख्यात नक्षलवाद्याला अटक

चाकणमध्ये कुख्यात नक्षलवाद्याला अटक

Subscribe

चाकणमध्ये कुख्यात नक्षलवाद्याला अटक करण्यात झारखंड पोलिसांना यश आले आहे. झारखंड पोलिसांची ही खुप मोठी कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईसाठी झारखंड पोलिसांनी पुणे एटीएसची मदत घेतली. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याने झारखंडच्या रामगढ पोलीस ठाण्याचे तत्त्कालीन पोलीस अधीक्षक अमरजित बलिहाड यांची हत्या केली होती. त्याचबरोबर त्याने अन्य पाच जणांची देखील हत्या केल्या आरोप त्याच्यावर आहे. या नक्षलवाद्यावर झारखंड पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. अखेर या नक्षलवाद्याला पुण्याच्या चाकण येथून अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – पीएमसी घोटाळ्याचा पहिला बळी, ५१ वर्षीय खातेधारकाचा मृत्यू

- Advertisement -

नक्षलवाद्यावर एक लाख रुपयांचे होते बक्षीस

आकाश मुर्मू असे या नक्षलवाद्याचे नाव आहे. झारखंडमधील पोलीस अधीक्षकासह पाच जणांची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. झारखंड पोलीस कित्येक दिवसांपासून त्याचा शोध घेत होती. या नक्षलवाद्यावर एक लाखांचे बक्षिस होते. तो चाकणमधील आळंदी फाटा येथील कंपनीत काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. झारखंड पोलिसांनी एटीएसच्या मदतीने नक्षलवाद्याला अटक केली. हा नक्षलवादी एका माओदी संघटनेचा सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -