घरमहाराष्ट्रमतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज

मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज

Subscribe

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २१ तारखेला मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून रविवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. मुंबई शहरात १० विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ ते ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या दरम्यान मतदारराजासाठी अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.
यंदा एकूण २ हजार ४५७ दिव्यांग मतदार मतदान करणार आहेत. यापैकी १ हजार १०० लोक हालचाल करु शकणार नाहीत त्यांच्यासाठी अधिकारी मदत करणार आहे. तर, २ हजार ५९२ मतदान केंद्रावर मतदान केलं जाणार आहे. अपंग आणि वृद्धांसाठी तळमजल्यावर मतदान केंद्रांची सेवा देण्यात आली आहे. तसंच, ९५ मतदान केंद्रांवर लिफ्टची सोयसुद्धा करण्यात आली आहे.

धारावी मतदारसंघात ५८ मतदान केंद्रे एकाच मतदान केंद्रात आहेत. मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोग सज्ज आहे. लहान मुलांपासून जेष्ठ लोकांसाठी सुद्धा सोय आहे. प्रत्येक मतदारसंघात दोन व्हॅन असणार. ५२१ व्हीलचेअरची सेवा देणार असून त्यासाठी स्वयंसेवक नेमलेले आहेत. पोलीस बंदोबस्त सुद्धा प्रत्येक मतदारसंघात तैनात असणार आहे..

- Advertisement -

आचारसंहितेच्या काळात ८ कोटी जप्त 

आचारसंहितेच्या काळात ८ कोटी ४७ लाख रुपयांची कॅश जप्त केली आहे. आतापर्यंत जी रक्कम जप्त करण्यात आली आहे ती निवडणूक आयोगाच्या पथकाच्या कारवाईत आहे. १० लाखांच्या वरची जी रक्कम पकडली असेल ती इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना सोपवण्यात येते. तसंच, वरळीत जी रक्कम पकडण्यात आलीय ती रक्कम एका सहकारी बँकेची आहे असं सांगण्यात येत होतं. पण, संशयित रक्कम म्हणून आम्ही ती रक्कम इन्कम टॅक्स कडे सोपवली आहे. आरबीआयच्या नियमानुसार गाडीतून रक्कम नेताना पोलीस हवे असतात. दरम्यान, आचारसंहिता काळात एकूण चार गुन्हे दाखल झाले आहेत.

२०, २१ आणि २४ तारखेला ड्राय डे 

निवडणूक काळात आणि निकालादरम्यान म्हणजेच २०, २१ आणि २४ तारखेला ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. ईव्हीएम मशीन बद्दल येणाऱ्या तक्रारींसाठी राखीव मशीनची सोय करण्यात आली आहे. एकूण ३ हजार ३७६ व्हीव्हीपॅट मशीन्स आहेत. सोबतच कर्मचाऱ्यांना पुरेशे प्रशिक्षण दिले आहे.

- Advertisement -

हे आहेत महत्त्वाचे मुद्दे –

  • ९२ टक्के लोकांपर्यंत वोटर चिट्ट्या पोहोचवण्यात आम्हाला यश आले आहे
  • २४ तारखेला सकाळी ८ वाजता निकालाला सुरुवात होईल
  • २१०० हजार कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमणूक केलेली आहे
  • आज ते मतदान केंद्रावर हजर होतील
  • मॉक ड्रिल घेऊन तपासणी करण्यात येईल
  • निवडणुकीसाठी निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालय सज्ज झाले आहे
  • जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे
  • पावसापासून बचाव होण्यासाठी ५९४ मंडप बांधले आहेत
  • जे कॅनल उभारण्यात आले आहेत ते पूर्णपणे वॉटरप्रूफ आहेत याची आम्ही खबरदारी घेतली आहे
  • मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर महापालिका सज्ज आहे

हेही वाचा –

‘धनंजय मुंडे यांच्या शब्दांमुळे राजकारण सोडावसं वाटतंय’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -