घरमहाराष्ट्रमनसेच्या आमदाराने घेतले एकविरा देवीचं दर्शन

मनसेच्या आमदाराने घेतले एकविरा देवीचं दर्शन

Subscribe

" एकच वादा.. राजू दादा " मनसेच्या आमदाराचे गाणं व्हायरल

कल्याण ग्रामीण विधानसभेतून मनसेचे आमदार प्रमोद(राजू)पाटील यांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर त्यांनी रविवारी कार्ला येथे सह कुटुंब जाऊन एकविरा मातेचं दर्शन घेतलं आहे.” एकच वादा राजू दादा ” हे त्यांचे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालंय.

राज्यात मनसेचा एकमेव आमदार निवडून आले आहे. राजू पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. मात्र त्यांच्या निवडणूक काळात त्यांच्या गाण्यांची आणि त्यांच्या कार्याची संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणूक काळात ” एकच वादा राजू दादा ” हे त्यांचे गाणे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी सर्वात पहिले टोरंट कंपनीच्या बिरोधात रस्त्यावर उतरून भूमीपुत्रांच्या लढ्यात सहभाग घेतला होता.रविवारी त्यांनी आपल्या कुटुंबियांसह लोणावळा कार्ला येथे श्री एकविरा मातेचे दर्शन घेतले आहे.तर कल्याण आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये भूमीपुत्रांवर होत असलेले अन्याय दूर होण्यासाठी प्रार्थना आई एकविरा चरणी केली असल्याची प्रतिक्रिया आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -