घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये ८१ हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण

नाशिकमध्ये ८१ हजार हेक्टरचे पंचनामे पूर्ण

Subscribe

९ नोव्हेंबरपर्यंत पिकांचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतर नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत ८१ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे सुरू करण्यात आले असून आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील ८१ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. ९ नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले असून पावसामुळे पंचनामे करण्यात अडथळे येत आहेत. त्यात आता पुन्हा ६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने पंचनामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ५० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. जिल्हा प्रशासन यंत्रणा पंचनाम्याच्या कामाला जुंपली असून आतापर्यंत १५२४ गावांतील १ लाख २२ हजार ९८९ शेतकऱ्यांचे ८१ हजार हेक्टरवरील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत नुकसानीचे पंचनामे मिशन मोडवर हाती घेऊन ९ नोव्हेंबरपर्यंत पंचनाम्याचे अहवाल पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – अवकाळी पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले; कांद्याने रडवले

अवकाळीमुळे ५० टक्के पिकांचं नुकसान

अवकाळीने सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, देवळा, सिन्नर या तालुक्यातील पिकांचं सर्वाधिक नुकसान झालं. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी आणि कळवण या तालुक्यांमध्ये काही प्रमाणात द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात या वर्षी ७.४० लाख हेक्टर इतके क्षेत्र लागवडीखाली होते. अवकाळी पावसाने सुमारे ३.२६ लाख हेक्टरवरील पिकांचे म्हणजेच पन्नास टक्के पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये द्राक्ष आणि मका या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

पूर्ण झालेले पंचनामे

जिरायत क्षेत्र
बाधित गाव – १३७४
बाधित शेतकरी – ९२५६३
क्षेत्र – ४७,८७७

- Advertisement -

बागायत क्षेत्र
बाधित गाव – ७११
बाधित शेतकरी – १३९६६
क्षेत्र – १३,१८१

फळपीक
बाधित गाव – ६८०
बाधित शेतकरी – १६४८०
क्षेत्र – १९५०४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -