घरमहाराष्ट्रहॅट्स ऑफ किरण! १९ वर्षांच्या किरणने मैत्रीसाठी केले केस दान

हॅट्स ऑफ किरण! १९ वर्षांच्या किरणने मैत्रीसाठी केले केस दान

Subscribe

मैत्रीच्या नात्यासाठी औरंगाबादच्या किरण गीते या १९ वर्षाच्या तरुणीचे केस दान केले आहे. यामुळे तिने समाजासमोर एक वेगळा आदर्श तयार केला आहे.

कर्करोगावर केल्या जाणाऱ्या जनजागृतीमुळे सामान्य लोक आता उपचार घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. सतत घेतल्या जाणाऱ्या केमोथेरपीमुळे अनेकदा महिलांचे केस जातात. सौंदर्य म्हणजे लांबसडक केस अशी भावना असणाऱ्या कर्करोगग्रस्त स्त्रियांसाठी केसांशिवाय कसं जगणार ही एक समस्या असते. या समस्येवर केस दान करून एखाद्याच्या आयुष्यात गेलेला आनंद परत देता येऊ शकतो याच उद्देशाने औरंगाबादमधील १९ वर्षीय किरण गीते हिने नुकतेच कर्करोगग्रस्तांसाठी केस दान करत समाजासमोर एक वेगळा आदर्श तयार केला आहे.

किरणच्या बालमैत्रिणीला लहानपणीच रक्ताचा कर्करोग झाला होता. तिला कळलं होतं की, ती कर्करोग बरा करू शकत नाही. पण तिच्यासाठी काहीतरी करावं अशी इच्छा अनेक वर्षांपासून होती आणि याच हेतूने किरणने रविवारी कर्करोगग्रस्तांसाठी केस दान केले. किरण सध्या औरंगाबादमध्ये पत्रकारितेचं शिक्षण घेत आहे. एवढ्या लहान वयात घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे तिच्यावर सध्या कौतुकाचं वर्षाव होत आहे.

- Advertisement -

याविषयी किरण गिते हिने सांगितलं की, “दोन वर्षांपासून मला काहीतरी दान करायचं होतं. मदत नावाच्या संस्थेबद्दल मला कळलं. त्यानंतर मी तिथल्या लोकांशी संपर्क केला. तिथून मला सर्व केस दान करण्यासाठीची जी प्रक्रिया हवी होती ती मिळाली. त्यानंतर, मी रविवारी पार्लरमध्ये जाऊन जसे हवे तसे केस कापून घेतले. आणि पुण्याच्या मदत संस्थेला कुरीअर केले. त्या केसांचे विग तयार करुन ते कर्करोगग्रस्तांना देतील. माझ्या लहानपणीच्या एका मैत्रिणीला रक्ताचा कर्करोग झाला आहे. जेव्हा तिची केमोथेरपी झाली तेव्हा तिचे केस गळायला लागले. तेव्हाच ठरवलं की तिच्यासाठी काहीतरी करायचं आहे. म्हणून मी केस दान केले. केस दान करून मला समाधान मिळत आहे. या सर्वांसाठी माझ्या आई-वडिलांनीही खूप सपोर्ट केला.”

तसंच, कर्करोग असा बरा करता येऊ शकतो. पण, त्यासाठी योग्य उपचार होणं गरजेचं आहे. शिवाय, समाजात आणखी जनजागृती होणं फार महत्त्वाचं असल्याचंही किरण सांगते. या अगोदर मुंबईतही काही महिन्यांपूर्वी २० वर्षीय गौतमी जाधव या तरुणीने कर्करोगग्रस्तांसाठी केस दान केले होते.

- Advertisement -

नक्की पाहा – या कारणामुळे ‘गौतमी’ करतेय केस दान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -