घरदेश-विदेशपरिक्षेत पास होण्याची ऑफर देत केली शारीरिक सुखाची मागणी

परिक्षेत पास होण्याची ऑफर देत केली शारीरिक सुखाची मागणी

Subscribe

छत्तीसगडमधील एका शिक्षकावर विद्यार्थ्यांना परिक्षा पास करण्यासाठी त्यांच्याकडून शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप लावला गेला आहे.

दररोज मुलींवर होण्याऱ्या अत्याचारबाबत आपण सगळेच ऐकत असतो. मुलींवर होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटना फार वाढलेल्या आहे. मुलींनी नक्की कोणावर विश्वास ठेवायचा असा मोठा प्रश्न उभा राहतो. कारण नातेवाईक, नेते ते ओळखीच्या माणसांनी देखील स्त्रीवर केलेल्या अत्याचाराबद्दलच्या घटना समोर आल्या आहेत. तर अशीच एक घटना छत्तीसगडमध्ये देखील घडलेली आहे. छत्तीसगडमधील एका शाळेच्या शिक्षकानं विद्यार्थ्यांना परिक्षेत पास करण्यासाठी शारिरीक सुखाची मागणी केलयाची घटना समोर आली आहे. तर या शिक्षकांनं महिला विद्यार्थ्यांकडून शारिरीक सुखाची मागणी केली आणि इतर विद्यार्थ्यांकडून चिकन देण्याची मागणी केली आहे.

हा शिक्षक विद्यार्थ्यांकडून काय मागणी करायचा?

शाळेतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहिती नुसार या शिक्षकाचं नाव राजेश कुमार भारद्वाज असून तो महिला विद्यार्थिनींकडून शारिरीक सुखाची मागणी करायचा. जर ही मागणी पूर्ण केली नाही तर त्यांना परिक्षेत नापास करून त्यापुढील परिणाम भोगावे लागणार अशी धमकी हा शिक्षक द्यायचा. अनेक महिला विद्यार्थिनींच्या म्हणण्याप्रमाणे हा शिक्षक त्याच्या शारिरीक आणि लैंगिक गर्जा पूर्ण करण्याकरीता शाळेतील अनेक विद्यार्थिनींकडे मागणी करायचा आणि त्यांना एखाद्या कारणावरूव धमकवायचा. त्यासह या विद्यार्थ्यांकडून हा शिक्षक चिकनची देखील मागणी करायचा. तर काही मुलींना हा शिक्षक मोबाईलवर ‘माझ्याशी बोल्लीस का नाही’ असे मेसेज देखील करायचा.

‘ते आम्हाला सांगायचे की जर आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या तर ते आम्हाला इतिहासाच्या पेपरला कॉपी करायला देतील’ – बारावीतील विद्यार्थीनी

- Advertisement -

मात्र जेव्हा या शिक्षकाला या संदर्भात विचारले गेले तेव्हा त्यांनी या सगळ्याला नकार दिला. ते असं काहीच करत नाही आणि फक्त विद्यार्थ्यांचं मनोरंजन करतात असं ते म्हणाले. त्या दरम्यान जिल्हा शिक्षणाधिकारींनी दावा दिला की या घटनेची ते कठोर कारवाई करतील.


हेही वाचा: अमित शहा यांना हिटलर होण्यापासून वाचवा – ओवैसी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -