घरफिचर्सकारोनेशन व मॅजेस्टिकचा पत्ता माहित आहे?

कारोनेशन व मॅजेस्टिकचा पत्ता माहित आहे?

Subscribe

सिनेमा थिएटर म्हणजे केवळ चित्रपट दाखवायची आणि बघायची जागा’ असे कदाचित आजच्या ‘मल्टिप्लेक्स पिढी’चे मत असेलही. पूर्वी मात्र कित्येक रसिकांची काही खास आवडती सिनेमा थिएटर असत. त्या वास्तूशी ते अगदी भावनिकदृष्ट्या जोडले जात. आपण ‘मराठा मंदिर’ थिएटरमध्ये ‘मुगल ए आझम’ १६ वेळा तर मिनर्व्हात ‘शोले’ तब्बल ३४ वेळा पाहिला हे सांगून मग त्या चित्रपटावर बोलत.......

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ प्रदर्शित झाला तो ३ मे १९१३ रोजी. तो जिथे प्रदर्शित झाला ते ‘कारोनेशन चित्रपटगृह’ नेमके कुठे होते याचे जुन्या पिढीला विलक्षण कुतुहल! आजच्या पिढीला यात फारसा रस असेल असे वाटत नाही. आज डॉ. भडकमकर मार्गावर (पूर्वीचा लॅमिंग्टन रोड) काही वर्षांपूर्वी बंद पडलेले ‘नाझ थिएटर’ आहे. नेमका त्याच्याच मागे मधुराश्रम आहे. या दोन्हीच्या मधल्या जागेत ‘कारोनेशन थिएटर’ होते. तेथे हा आपला पहिला चित्रपट, खरं तर वीस मिनिटांचा मूकपट, प्रदर्शित झाला. जुने कारोनेशन पाडून ‘न्यू कारोनेशन’ बांधले गेले. काही वर्षांनी तेदेखील पाडले आणि पुढील बाजूला ‘नाझ’ बांधले गेले.

आपल्याकडे चित्रपटाचा इतिहास पुन्हा-पुन्हा सांगितला जातो, त्यावर बरीच पुस्तकेदेखील आहेत. पण ज्या चित्रपटगृहांतून हा इतिहास रचला गेला, ते कायमच उपेक्षित अथवा दुर्लक्षित राहिले. अथवा अशा चित्रपटगृहांची पहिल्या काही वर्षांचीच माहिती समोर येते. खरेतर सत्तरच्या दशकात राजेश खन्ना आणि मग अमिताभ बच्चन यांच्या जबरदस्त ‘क्रेझ’च्या काळात देशातील चित्रपटगृहे धो-धो चालली…

- Advertisement -

चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘अयोध्येचा राजा’ या चित्रपटापासून आपला चित्रपट मराठीत बोलू लागला तर अर्देशीर इराणी यांच्या ‘आलम आरा’ या चित्रपटापासून हिंदीत बोलू लागला. विशेष म्हणजे एव्हाना आपल्याकडे पूर्ण लांबीचा चित्रपट तयार होऊ लागले होते. हे चित्रपट १९३२ साली काही दिवसांच्या अंतराने गिरगावातील मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाले. किती मोठी गोष्ट आहे ना? मॅजेस्टिक थिएटरची इमारत १९७२ साली पाडली गेली आणि त्याजागी ‘गोवानी चेंबर्स’ उभे ठाकले. पण त्या वास्तूवर अथवा जवळ ‘येथे पहिला बोलपट प्रदर्शित झाला’ असा शिलालेख कोरलेला असणे गरजेचे होते. पण खुद्द चित्रपटसृष्टीला ‘थिएटर म्हणजे एक इमारत फक्त’ असे वाटत असेल का?
चित्रपट शौकिनांच्या पुढील पिढ्यांना या महत्त्वाच्या गोष्टी माहिती करून देणे गरजेचे आहे. पण लक्षात कोण घेतो? होय ना?

————————–

(लेखक ज्येष्ठ सिनेअभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -