घरताज्या घडामोडीअरेच्चा! गावातील प्रत्येक घरावर चक्क 'विमान'

अरेच्चा! गावातील प्रत्येक घरावर चक्क ‘विमान’

Subscribe

पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील 'लांबडा' गावात प्रत्येक बंगल्याच्या छतावर चक्क 'विमान'.

प्रत्येकाचे स्वप्न असते. आपले स्वत:चे हक्काचे घर असावे आणि त्या घरासमोर एखादी चार चाकी गाडी देखील उभी असावी. मात्र, असे एक गाव आहे ज्या गावात प्रत्येक घरावर चक्क ‘विमान’ असल्याचे समोर आले आहे. पंजाबच्या जालंधर जिल्ह्यात हे गाव असून ‘लांबडा’ असे या गावाचे नाव आहे. तसेच हे गाव अनिवासी भारतीयांचे श्रीमंत, असे गाव आहे. विशेष म्हणजे अनेक कुटुंबातील लोक परदेशात स्थायिक झाले असल्याने त्यांची मिळकत देखील मोठी असल्याचे समजते.

काय आहे हे अजब गाव

काही गावांचे एक वेगळे असे वैशिष्ट्य असते. असेच या ‘लांबडा’ गावाचे खास असे वैशिष्ट्य आहे. या गावातील बहुतांश घरांवर पाण्याच्या टाक्या चक्क विमानाच्या रुपातील आहे. या गावात अनेक मोठे बंगले असून, त्या बंगल्यांच्या छातावरील पाण्याच्या टाक्या विमानाच्या रंगरुपात बनवलेल्या आहेत. काहींना निव्वळ हौसेखातरच अशा विमानाच्या प्रतिकृती बनवल्या आहेत. तर काहींनी विमानाने परदेशात गेलेल्या आपल्या प्रियजनांचे प्रतीक म्हणून अशी विमाने घरांवर आहेत. विशेष म्हणजे अनेक किलोमीटरवरुन या गावाचा हा ‘नजारा’ पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अजब! नवरदेव म्हणतो…मला हवी १०० किलो वजनाची नवरी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -