घरताज्या घडामोडी'मी प्रेग्नेट आहे, उपचाराचे ६० हजार रुपये द्या आणि माझ बाळ घेऊन...

‘मी प्रेग्नेट आहे, उपचाराचे ६० हजार रुपये द्या आणि माझ बाळ घेऊन जा’

Subscribe

प्रेग्नेट असल्याचे भासवून, डिलिव्हरीनंतर जन्मलेले बाळ देऊ, असे सांगून बाळाची चोरी करणाऱ्या वेश्याव्यवसाय महिलेला अटक करण्यात आली आहे.

प्रेग्नेट असल्याचे भासवून, ‘डिलिव्हरीनंतर माझे जन्मलेले बाळ देते’,असे सांगून ६० हजार उकळणाऱ्या एका वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या वेश्याव्यवसाय महिलेने उत्तर प्रदेशमधून अडीच महिन्याचे बाळ चोरुन ते बाळ नवी मुंबईतील एका जोडप्याला विकण्याचा घाट घातला होता. मात्र, पोलिसांनी या आरोपी महिलेचा डाव हाणून पाडत चिमुकल्याची सुटका केली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

नवी मुंबई येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला लग्न होऊन अनेक वर्षे झाली होती. मात्र, त्यांना बाळ होत नव्हते. दरम्यान, त्यांचा एका वेश्याव्यवसाय महिलेशी संपर्क आला. त्यानंतर त्या वेश्याव्यवसाय महिलेनी सांगितले की, ‘मी प्रेग्नेट आहे. तसेच माझे बाळ मी तुम्हाला देते. मात्र, तुम्हाला रुग्णालयात होणाऱ्या उपचाराचे ६० हजार रुपये द्यावे लागतील आणि मग माझे बाळ तुम्ही घेऊ जा’, असे सांगत या महिलेने त्या दामपत्यांकडून तब्बल ६० हजार रुपये उकळले. त्यानंतर आरोपी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे जाऊन तिथून एक अडीच महिन्याचे बाळ चोरले.

- Advertisement -

दरम्यान, या बाळचोरीची तक्रार संबंधित पालकांनी आग्रा पोलिसात दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद करुन, बाळाच्या शोधासाठी एक पथक तयार केले होते. हे पथक शोध घेत नवी मुंबईत दाखल झाले. त्यावेळी एपीएमसी पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतले आणि तिची विचारपूस करण्यात आली, त्यावेळी हा गुन्हा उघड झाला.


हेही वाचा – गोवंडीत पादचारी पुलाचा सांगाडा कोसळला; दोन गंभीर जखमी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -