घरताज्या घडामोडीमुंबईत उद्या पाणीबाणी! पाईपलाईन फुटली!

मुंबईत उद्या पाणीबाणी! पाईपलाईन फुटली!

Subscribe

मुंबईच्या काही भागांमध्ये उद्या म्हणजेच शनिवार १ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित किंवा कमी दाबाने होणार आहे.

मेट्रो मार्गाचं काम सुरू असताना जेव्हीएलआर रोडवरची सीप्झ पुलाच्याच बाजूला असलेली पाण्याची मोठी पाईपलाईन गुरुवारी सकाळी फुटली. वेरावली जलाशयाला या पाईपलाईनने पाणीभरणा केला जातो. १८०० मिमीची ही पाईपलाईन वेरावली जलाशयासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. या भागात मेट्रोच्या मार्गिकेसाठी खोदकाम सुरू असताना पाईपलाईनच्या इनलेट वॉल्व्हला धक्का लागला. यामुळे झालेल्या नादुरुस्तीमुळे शुक्रवारी आणि उद्या म्हणजेच शनिवार १ फेब्रुवारी रोजी के पूर्व आणि के पश्चिम (अंधेरी), या भागामध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. त्याशिवाय, वांद्रे पश्चिम, कलिना, जोगेश्वरी, घाटकोपर पश्चिम, नेहरू रोड आदी परिसरामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. दरम्यान, या पाईपलाईनची दुरुस्ती होईपर्यंत सहकार्य करण्यची विनंती पालिका प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आली आहे. दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर २ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

water pipe repairing work
पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम सुरू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -