घरताज्या घडामोडीशिवसेना दोन वेळा शिवजयंती साजरी करणार का?

शिवसेना दोन वेळा शिवजयंती साजरी करणार का?

Subscribe

विनायक मेटे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल; तारखेप्रमाणे जयंती साजरी करण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री प्रत्येकवर्षी शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करतात. त्यामुळे यावर्षी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर शिवरायांना अभिवादन करतील. मात्र, शिवसेना तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणार का? असा प्रश्न उपस्थित करत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी तारखेप्रमाणेच शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नाशिकमधील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी (दि.4) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विनायक मेटे म्हणाले, राज्यपालांनी अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी आठ हजार रुपयांची मदत जाहीर केलेली असताना उद्धव ठाकरे यांनी 25 हजार रुपये मदतीचे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे शेतकरी कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. परंतु, आता ते प्रत्यक्षात सत्तेत असताना त्यांना या सर्व आश्वासनांचा विसर पडल्याचे दिसत आहे. सरकारमध्ये अनेक मतभेद असल्याने हे सरकार दीर्घकाळ चालण्याचे संकेत नाही. अशा स्थितीत मुख्यमंत्री कर्जमुक्तीची घोषणा कधी करणार? असा सवाल उपस्थित करतानाच शिवसेनेने शिवजयंतीच्या बाबतीतही दुटप्पी भूमिका सोडून तारखेप्रमाणेच शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले. यासाठी 19 फेब्रुवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतानाच शिवसेनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -