घरक्रीडा२९ मार्च ऐवजी १५ एप्रिलपासून सुरू होणार आयपीएल

२९ मार्च ऐवजी १५ एप्रिलपासून सुरू होणार आयपीएल

Subscribe

करोनामुळे आयपीएल पुढे ढकलावी अशी विनंती राज्य सरकारने केली होती. अखेर यंदाची आयपीएल लांबणीवर गेली आहे. आज बीसीसीआय अध्यक्षतेखाली सौरव गांगुलींनी बैठक घेतली होती. २९ मार्च ऐवजी १५ एप्रिलपासून आयपीएल सुरू होणार असल्याचा निर्णय घेतला आहे. १८ दिवसांनी आयपीएल लांबणीवर गेली आहे. दिल्ली सरकारने आयपीएल सामने आयोजनास आज नकार दिला होता.

बीसीसीआयचे एक अधिकारी म्हणाले, आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय अंतर्गत घेण्यात आला आहे. १५ एप्रिलपासून आयपीएल सुरू होणार आहे. बुधवारी सरकारने काही अधिकाऱ्यांना सोडून सर्व परदेशी व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दिल्ली सरकारने आयपीएलचे सामने दिल्लीत होणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

सध्या जगभरात करोना धुमाकूळ घालत आहे. भारतात देखील आता करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील करोना ग्रस्तांचा आकडा ८० वर गेला आहे. त्यापैकी महाराष्ट्रात १६ करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – स्टेडियमकडे फिरकूच नका; बीसीसीआयची क्रिकेट रसिकांना तंबी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -