घरCORONA UPDATECoronaVirus - मुंबईतील 'या' चार विभागात कोरोना रुग्णांची संख्या चाळीसच्या वर!

CoronaVirus – मुंबईतील ‘या’ चार विभागात कोरोना रुग्णांची संख्या चाळीसच्या वर!

Subscribe

वरळी प्रभादेवीसह भायखळ, चिंचपोकळी,ताडदेव,मुंबई सेंट्रलला धोका

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मुंबईकरांसमोरील चिंताही अधिकच वाढू लागली आहे मुंबईतील जी-दक्षिण, ई, डि आणि के-पश्चिम या चार विभागांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची चाळीस पार केली आहे. त्यामुळे  दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढणारा आकडा आता मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकताना दिसत आहे. सोमवारपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार संपूर्ण मुंबईत एकूण ४९० पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे आढळून आले होते.

शहरातील वरळी, प्रभादेवी या ‘जी-दक्षिण’ विभागात प्रत्येक दिवशी सरासरी १० पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडतच आहे. या विभागात आणखी १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून सोमवारपर्यंत एकूण या विभागात ७८ पॉझिटिव्ह रुग्ण झाले होते. वरळी कोळीवाडा, प्रभादेवी, आदर्श कॉलनी, जनता नगर, पोलिस वसाहत आदी ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे या विभागात सर्वांधित संसर्ग होवून रहिवाशांना बाधा झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महापालिकेने येथील  निकट व कमी संपर्कातील लोकांना क्वारंटाईनमध्ये हलवले असले तरी त्यांच्या तपासणीनंतर काहींचे अहवाल हे आता पॉझिटिव्ह येत असल्यामुळे या विभागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

तर भायखळा, चिंचपोकळी या ‘ई’ विभागाने आणखी ४ रुग्णांची भर पडल्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४८ वर पोहोचली आहे. तर त्या खालोखाल भवन्स कॉलेज परिसर, डि.एन.नगर परिसर, आदी भागांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. परवापर्यंत या विभागात ३७ पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्यात काल ३ची भर पडत ही संख्या ४० वर पोहोचली आहे.

याशिवाय मलबार हिल,  नेपियन्स रोड, ताडदेव, मुंबई सेंट्रल ग्रँटरोड या ‘डि’ विभागात ९ ने संख्या वाढून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४३ तर विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व या ‘के-पूर्व’ विभागात सुदैवाने कालपर्यंत एकाही रुग्णांची अधिक वाढ झालेली नाही. या विभागात आतापर्यंत २६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisement -

६ मार्चपर्यंत प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची वॉर्डनिहाय आकडेवारी

सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून पहिले पाच वॉर्ड

जी-दक्षिण (वरळी,प्रभादेवी,लोअरपरळ) :  ७८

ई (भायखळा,चिंचपोकळी) : ४८

के-पश्चिम(विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम) : ४०

डि, (मलबार हिल,मुंबई सेंट्रल,ग्रँटरोड) : ४३

के-पूर्व, (विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व) :२६

सर्वात कमी पॉझिटिव्ह रुग्ण असलेले टॉप फाईव्ह विभाग

बी (डोंगरी, पायधुणी,भेंडीबाजार)  : ०५

ए  (कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉईंट)  : ०६

सी (चिराबाजार, चंदनवाडी, गिरगाव) :०७

एफ-दक्षिण (परळ,लालबाग, शिवडी) : ०७

आर-उत्तर (दहिसर)

पॉझिटिव्ह रुग्णनिहाय वॉर्डांची नावे

२० पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्णांची ठिकाणे : जी-दक्षिण, ई, डि, के-पूर्व, के-पश्चिम,पी-उत्तर,एम-पश्चिम, एच- पूर्व

११ते २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेली ठिकाणे : एन, एम-पूर्व,एच-पश्चिम ,एस, आर-दक्षिण,एल, पी-दक्षिण

१० पर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले वॉर्ड : जी-उत्तर, सी, ,  ए, एल, एफ-उत्तर,  आर-उत्तर, आर-मध्य, टी, एफ-दक्षिण, बी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -