घरताज्या घडामोडीCoronaVirus: २४ तासात लपलेल्या तबलीग सदस्यांनी पोलिसांना शरण जा!

CoronaVirus: २४ तासात लपलेल्या तबलीग सदस्यांनी पोलिसांना शरण जा!

Subscribe

तबलीग जमातीत लपलेल्या लोकांना पंजाब सरकारने इशार दिला आहे. त्यांना २४ तासांची मुदत पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यासाठी दिली आहे.

दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजमध्ये सामील झालेल्या तबलीग जमातमधील लपलेल्या सदस्यांना पंजाब सरकारने इशारा दिला आहे. या लपलेल्या तबलीग जमातमधील सदस्यांना २४ तासात जवळच्या पोलीस ठाण्यात यायला सांगितलं आहे. अन्यथा त्यांच्या फौजदार गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पंजाब माहिती व जनसंपर्क विभागाने एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनेही मंगळवारी सांगितलं की, तबलीग जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या राज्यातील १४०० लोकांपैकी ५० लोकांनी आतापर्यंत सरकारशी कोणताही संपर्क साधलेला नाही.

त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समोर न येणाऱ्या तबलीग जमातमधील सदस्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. ते म्हणाले की, अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेल्या लोकांना राज्य सरकार वेगळे ठेऊन त्यांची काळजी घेईल. गेल्या महिन्यात आयोजित केलेल्या या तबलीग जमातीच्या कार्यक्रमात ४ हजार लोकांनी सहभाग घेतला आहे. ज्यामध्ये काही लोक कोरोनाबाधित आढळले तर काही लोकांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे.

- Advertisement -

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील १४०० लोकांनी सहभाग घेतला होता. त्यातील १३५० लोकांचा शोध लागला असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती, गृहमंत्री देशमुख यांनी दिली होती. उर्वरित ५० लोकांचे मोबाईल फोन अजूनही बंद आहेत. म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांना स्वतः सरकारशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं.

- Advertisement -

हेही वाचा – तबलीगींचा किळसवाणा प्रकार : क्वॉरंटाइन सेंटरमध्ये उघड्यावर केला संडास


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -