घरताज्या घडामोडीखासगी विद्यापीठाची फीसाठी सक्ती

खासगी विद्यापीठाची फीसाठी सक्ती

Subscribe

वेळेत शुल्क न भरल्यास प्रवेश रद्द करण्याची धमकी; परीक्षेसही बसू देणार नाही

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संस्थांना फी वसुलीची सक्ती न करण्याचे आदेश दिलेले असताना खासगी विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांमागे टूरका लावला जात आहे. इतकेच नव्हे तर येत्या दि. 8एप्रिलपर्यंत शुल्क न भरल्यास प्रवेशही रद्द करण्यात येणार असून, पुढील सत्रातील परीक्षेसही बसू जाणार नसल्याची धमकीच दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात शाळा, महाविद्यालय व विद्यापीठांना सुटी देवून ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन लेक्चर, होमवर्क देवून पुढील सेमिस्टर व परीक्षांची तयारी करुन घेतली जात आहे. परीक्षांचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नसताना खासगी विद्यापीठांनी आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्यादृष्टीने सूचना देण्यास सुरुवात केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ट व्हायचे आहे, त्यांनी उर्वरीत फी दि.8 एप्रिलपर्यंत भरावी, असे आवाहन केले आहे. फी न भरणार्‍या विद्यार्थ्यांना दि.9 एप्रिलपासून सुरु होणार्‍या ऑनलाईन तयारी वर्गासाठी प्रवेश नाकारण्यात आला आहे. विद्यापीठाने ही अंतिम सूचना दिली असून, विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास त्यांनी विभागप्रमुखांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -