घरCORONA UPDATECoronavirus: भारत प्लाझ्मा थेरपीच्या चाचण्या सुरू करण्याच्या तयारीत

Coronavirus: भारत प्लाझ्मा थेरपीच्या चाचण्या सुरू करण्याच्या तयारीत

Subscribe

देशातील सर्वोच्च बायोमेडिकल संशोधन संस्था, इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ही चाचणी घेण्याच्या मार्गदर्शक सूचनांवर काम करत आहे. हा मसुदा तयार झाल्यानंतर, चाचण्या घेण्यास मान्यता देण्यासाठी औषध नियंत्रक, भारतीय ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे जाईल.

भारत कोरोनाच्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्याच्या तयारीत आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर बरे झालेल्या रुग्णांच्या रक्ताने कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी क्लिनिकल चाचण्या सुरू करण्याच्या तयारीत आहे. देशातील सर्वोच्च बायोमेडिकल संशोधन संस्था, इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ही चाचणी घेण्याच्या मार्गदर्शक सूचनांवर काम करत आहे. हा मसुदा तयार झाल्यानंतर, चाचण्या घेण्यास मान्यता देण्यासाठी औषध नियंत्रक, भारतीय ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे जाईल.

“येत्या काही दिवसात मसुदा तयार झाला पाहिजे. हे एक नवीन औषध असल्याने ते क्लिनिकल ट्रायल मोडवर द्यावे लागेल, ज्यासाठी ड्रग्स नियंत्रकांची मान्यता आवश्यक आहे. हा मसुदा तयार झाल्यावर आयसीएमआर प्रोटोकॉलनुसार डीसीजीआयकडे देशात क्लिनिकल चाचणी घेण्यास मान्यता देण्यासाठी पाठवण्यात येईल,” असं चेन्नईचे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजीचे संचालक डॉ. मनोज व्ही मुरहेकर यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – अमेरिकेचे लक्ष चीनवर…अन् कोरोना आला युरोपमधून


चीनमध्ये १० रुग्णांवर ही पद्धत वापरण्यात आली होती. गंभीर आजारी असलेल्या एका रुग्णाला एक डोस देण्यात आला. त्यानंतर त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसायला सुरुवात झाली. इतर देशांमध्ये, हे मर्यादित रूग्णांसाठी उपयुक्त असल्याचं आढळलं आहे जे व्हेंटिलेटरच्या आधारावर होते. हे प्रत्येकासाठी नाही परंतु प्रारंभ करण्यासाठी आम्ही अशा रूग्णांची निवड करणार आहोत ज्यांना हे औषध अभ्यासाच्या पद्धतीवर दिले जाईल, असं डॉ मुरहेकर म्हणाले. पुढे ते म्हणाले की, डीसीजीआय मंजूर करेपर्यंत क्लिनिकल चाचणी देशात कोठेही सुरू होऊ शकत नाही.

- Advertisement -

जुन्या रुग्णांच्या रक्ताने नवीन रुग्णांवर उपचार करण्याच्या तंत्राला शास्त्रज्ञ कोव्हॅलेंट प्लाझ्मा म्हणतात. याद्वारे, जुन्या बरे झालेल्या रूग्णांचे रक्त नवीन रुग्णांच्या रक्तामध्ये टाकून रोग प्रतिकारशक्ती वाढविली जाते. या तंत्रामध्ये रक्ताच्या आत असलेल्या विषाणूशी लढण्यासाठी अँटीबॉडी तयार केले जातात. या अँटीबॉडीज विषाणूंविरूद्ध लढतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -