घरताज्या घडामोडीमालेगावात नवीन 13 रुग्ण पॉझिटिव्ह

मालेगावात नवीन 13 रुग्ण पॉझिटिव्ह

Subscribe

कोरोना आजाराने नाशिक जिल्ह्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित व संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी (12) रात्री जिल्हा रुग्णालयास 13 जणांचे रिपोर्ट मिळाले आहेत. हे पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील आहेत.  आता मालेगावात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 27 झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 33 झाले आहेेेत.

मालेगाव, चांदवड, लासलगाव व नाशिक शहरातील गोविंदनगर, आनंदवली, नाशिक रोड येथे कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या ठिकाणी पोलिसांनी लॉकडाऊन केले आहे. आरोग्य विभागाने शनिवारी (दि.11) रुग्णांच्या संपर्कातील 36 नातलग व नागरिकांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  कोरोनाबाधित देशातून नाशिक जिल्ह्यात आलेले व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले नागरिक एक हजार 62 आहेत. जिल्हा रुग्णालयास रविवारी सकाळी 13 जणांचे रिपोर्ट मिळाले असून ते पॉझिटिव्ह आले आहेत.  नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सामाजिक अंतर ठेवावे, अत्यावश्यक कारणास्तव घराबाहेर येणाऱ्या नागरिकांनी मास्क परिधान करावे व सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन कोरोना जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -