घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus:अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा ८ लाखांवर तर ४४ हजारहून अधिक जणांचा मृत्यू!

CoronaVirus:अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा ८ लाखांवर तर ४४ हजारहून अधिक जणांचा मृत्यू!

Subscribe

जगात कोरोना विषाणू फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण पसरले आहे. अमेरिका हे जगातील कोरोनाच केंद्र बनलं आहे. अमेरिकत सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठच्या अहवालानुसार, अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा ८ लाखांवर पोहोचला असून ४४ हजार ८४५ कोरोनाचे रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. मंगळवारी ४० हजार नवे कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कोरोनाचे सर्वाधित रुग्ण सापडले आहेत. न्यूयॉर्क शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २ लाखांहून अधिक आहे.

- Advertisement -

अमेरिके पाठोपाठ स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन या देशात कोरोना विषाणू थैमान घालत आहे. या जीवघेण्या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात १ लाख ७० हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ लाखांहून अधिक जण कोरोनाचे शिकार झाले आहे. त्यामुळे संपूर्ण जगात कोरोना विषाणूमुळे भयावह परिस्थिती निर्माण होत आहे.

भारतात देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. आतापर्यंत २० हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण देशात आढळले आहेत. देशातील काही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रालयाने सहा विशेष पथकांची स्थापना केली आहे. सध्या हे पथक त्या राज्यातील काही जिल्हात पाहणी करत आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ हजारहून अधिक आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कस्तुरबामधून करोनाचा १०० वा रुग्ण घरी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -