घरताज्या घडामोडीCoronaVirus: भ्रमनिरास! यावर्षी तरी कोरोनावर लस येणं अशक्य, म्हणाले ब्रिटनचे मंत्री

CoronaVirus: भ्रमनिरास! यावर्षी तरी कोरोनावर लस येणं अशक्य, म्हणाले ब्रिटनचे मंत्री

Subscribe

जगात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत असल्यामुळे लसची मागणीही वाढत आहे. अलीकडेच काही तज्ज्ञांनी निवेदनातून अशी आशा व्यक्त केली आहे की, यावर्षाच्या अखरेस कोरोनावर मात करणारी लस येऊ शकते. परंतु आता ब्रिटनच्या एका मंत्र्यानं असं विधान केलं आहे की, यावर्षाच्या अखेरस आमच्याकडे कोरोनावर मात करणारी लस उपलब्ध होणे अशक्य आहे.

ब्रिटनचे मंत्री डॉमनिक रॉब यांनी रविवारी एक निवेदन दिलं. ते म्हणाले की, लवकरात लवकर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे त्याप्रमाणे पावले उचलली जात आहेत. लस तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु यावर्षी लस येणे शक्य नाही आहे.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले, सध्या लोकांची टेस्ट घेणे सर्वात महत्त्वाचं आहे. जेणेकरून विषाणू किती पसरत आहे हे समजू शकेल. ब्रिटनच्या मंत्र्यानं केलेल्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होणार आहे. कारण ऑक्सफोर्ड विद्यापीठात कोरोना विषाणूच्या लसीची चाचणी सुरू झाल्यावर ब्रिटनच्या मंत्र्यानं हे विधान केलं आहे. एका महिलेवर लसीचा प्रयोग केला असून त्याचे परिणाम अजूनही आलेले नाही आहेत.

ऑक्सफोर्ड विद्यापीठ सध्या कोरोनाच्या लसीवर अभ्यास करत असून लसीचा चाचणी देखील केली जात आहे. लसीची चाचणी होण्यापूर्वी विद्यापिठाने दावा केला होता की, सप्टेंबरपर्यंत कोरोनाची लस तयार होईल. मोठ्या प्रमाणात लस तयार करण्यास सुरुवात केली आहे. जगातील विविध भागात सात उत्पादकांसह उत्पादन केलं जात आहे, असल्याचं म्हटलं होत. आतापर्यंत ब्रिटनमध्ये कोरोनाचे १ लाख ५२ हजार ८४० रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २ हजार ७३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: कोरोनामुळे गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बद्रुद्दिन शेख यांचे निधन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -