घरCORONA UPDATEHundred Web Series Review: पुन्हा एकदा रिंकूने जिंकली प्रेक्षकांची मनं!

Hundred Web Series Review: पुन्हा एकदा रिंकूने जिंकली प्रेक्षकांची मनं!

Subscribe

हंड्रेड मधील आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा रिंकुने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. रिंकूने जीव ओतून हे कॅरेक्टर उभं केलं आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे थिएटर्समध्ये कोणतीहा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला नाही तरी ऑनलाईन खजिना चाहत्यांसाठी भरपूर आहे. हॉटस्टारवर नुकतीच प्रदर्शित झालेली हंड्रेड ही वेबसिरीज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेबसिरीजमध्ये लव्ह, धोका आणि क्राईम यांची जबरदस्ती स्टोरी आहे. आठ भागांच्या या वेबसिरीजमध्ये लारा दत्त मोठ्या ब्रेक नंतर पुन्हा दिसली आहे. तर तीच्याबरोबर स्क्रीन शेअर केली आहे सैराट फेम रिंकू राजगुरूने. रिंकूची दमदार अँक्टिंग आणि लाराचा भन्नाट अंदाजामुळे ही वेबसिरीजही धम्माल बनली आहे.

- Advertisement -

वेबसिरीजची स्टोरी एसीपी सौम्या शुल्का (लारा दत्ता) आणि साधा सरकारी कर्मचारी नेत्रा पाटील (रिंकू राजगुरू) हीच्यावर ही वेबसिरीज आधारीत आहे. एक दिवस रिंकूला चक्कर येते. ती हॉस्पिटला जाते तीथे गेल्यावर तीला समजत की, तीला कँसर झाला आहे आणि पुढील १०० दिवसात तीचा मृत्यू होऊ शकतो. तर दुसरीकडे एसीपी लारा दत्तला तीच्या पतीमुळे आणि सीनीअर ऑफिसरमुळे काम करण्यात अडचणी येत आहेत. ऐके दिवशी नेत्रा आणि सौम्याची अचानक भेट होते. सौम्या नेत्राला आपलं हत्यार म्हणून वापरण्याचा निर्णय घेते. आणि सुरू होते खरी गोष्ट… ज्यात भरपूर मसाला आहे. या गोष्टीत क्राईम, प्रेम, धोका असं सगळं काही भरलेलं आहे.

View this post on Instagram

Behind the scenes ?

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

- Advertisement -

रिंकूने जिंकलं

हंड्रेड मधील आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा रिंकुने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. रिंकूने जीव ओतून हे कॅरेक्टर उभं केलं आहे. नेत्रामध्ये रिंकू एकदम परफेक्ट बसली आहे. तर बऱ्याच दिवसांनी काम करणाऱ्या लारानेही महत्त्वाकांक्षी पोलिस ऑफिसरची भुमिका चांगली निभावली आहे. मात्र असं असलं तरी वेबसिरीजमध्ये रिंकू राजगुरूच बाव खाऊन गेली आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये हंड्रेड ही वेबसिरीज नक्की बघा.


हे ही वाचा – Photos – फोटो बघून चाहते म्हणतात, ‘बोले तो एकदम झक्कास’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -