घरमहाराष्ट्रआजपासून राज्यात लॉकडाऊन ३.० लागू; वाचा काय आहेत अटी, नियम!

आजपासून राज्यात लॉकडाऊन ३.० लागू; वाचा काय आहेत अटी, नियम!

Subscribe

मुंबई, पुणे, नाशकात बाधित क्षेत्र वगळता,एकल दुकानेही सुरू करण्यास राज्याची परवानगी

लॉकडाऊनच्या काळात रेड झोनमध्ये समावेश असलेल्या मुंबई, नाशिक, पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये बाधित क्षेत्र वगळता इतर भागांत स्वतंत्र दुकानांसह दारुची दुकानेही खुली होणार आहेत. मद्यप्रेमींना दिलासा दिणारा हा निर्णय राज्य सरकारने घेतला असून मात्र काही अटींवरच ही परवानगी देण्यात आली आहे. करोनामुळे लॉकडाऊन ३.० पार्श्वभूमीवर राज्यात परवानगी देण्यात आलेल्या गोष्टी आणि बंदी कायम असलेल्या गोष्टी अशी यादी राज्य सरकारमार्फत जारी केली आहे. प्रत्येक झोननुसार कोणत्या गोष्टींना परवानगी आणि कोणत्या गोष्टींना मज्जाव याचे स्पष्टीकरण एका तक्त्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे. करोनासाठी करण्यात आलेल्या झोनच्या रचनेनुसार परवानगी आणि बंधने याचा खुलासा राज्य सरकारमार्फत करण्यात आला आहे. राज्यात ग्रीन, ऑरेंज, रेड, बाधित क्षेत्र, महापालिका क्षेत्र अशी वर्गवारी राज्य सरकारमार्फत करण्यात आली आहे. मॉल्स आणि प्लाझामधील दुकानांवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवेशिवाय सुरू राहणार्‍या दुकानांसाठी स्थानिक यंत्रणेमार्फत वेळ निश्चित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

या गोष्टींना सगळ्या झोनमध्ये परवानगी
मालवाहतूक करण्यासाठी सर्व झोनमध्ये परवानगी देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकानेही सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. वैद्यकीय सेवेसाठी आपत्कालीन मदत देण्यासाठी परवानगी आहे.

दारू दुकानांना परवानगी
बाधित झोन वगळता सर्वच ठिकाणी दारू विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील तळीरामांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई, नाशिक, ठाणे, पुणेे सारख्या रेड झोनमध्ये आता वाईन शॉप खुले केले जाणार आहेत. मात्र बाधित झोनमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही. एकाच रांगेत पाच अत्यावश्यक सेवेशिवाय असणार्‍या दुकानांना ही परवानगी देण्यात आली आहे. या दुकानांसाठी सोशल डिस्टन्सिंगचा निकष मात्र कायम ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय सलून, स्पा यासाठी ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये परवानगी देण्यात आली आहे. आंतरजिल्हा प्रवासासाठी बसची सुविधा फक्त ग्रीन झोनमध्ये सुरू करण्यात आली आहे. बाधित झोन वगळता मेडिकल, ओपीडीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच टॅक्सी, कॅब सेवेसाठी ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये परवानगी देण्यात आली आहे. पण टॅक्सीत ड्रायव्हर आणि दोन व्यक्तींसाठीच ही परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

ठळक वैशिष्ठ्ये
=रेड झोनमधील कन्टेंन्मेंट क्षेत्रात दारू दुकाने खुली ठेवण्यात अजिबात परवानगी नाही.
=प्रत्येक लेनमध्ये केवळ पाच दुकाने (जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता, मॉल आणि बाजारपेठांमधील नाहीत.) खुली ठेवण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
=जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्यावर बंधन नाही. सर्वच दुकानदारांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल.
=स्वतंत्र मद्याची दुकाने खुली ठेवता येणार आहेत. रेस्तराँ किंवा मॉलमधील दारूची दुकाने खुली ठेवता येणार नाहीत.
=सलून खुले ठेवता येणार नाहीत.
=परिस्थितीनुसार, स्थानिक प्रशासनांनी त्यांच्या पातळीवर दुकाने खुली ठेवण्याच्या वेळा निश्चित करावयाच्या आहेत.

या गोष्टींवर बंदी कायम
प्रवासाचे पर्याय असलेल्या ट्रेन, मेट्रो आणि हवाई वाहतुकीला सर्व झोनमध्ये बंदी कायम ठेवण्यात आली आहे. तसेच आंतरराज्य प्रवासासाठीही मज्जाव करण्यात आला आहे. शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेसवरील बंदी कायम आहे. तर मोठ्या संख्येने जमणार्‍या धार्मिक प्रार्थना, जमाव यासारख्या गोष्टींना सर्व झोनमध्ये मज्जाव करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -