घरदेश-विदेश१२ वर्षातील सर्वात कमी उष्णता; लॉकडाऊनसह ही आहेत तीन मुख्य कारणे

१२ वर्षातील सर्वात कमी उष्णता; लॉकडाऊनसह ही आहेत तीन मुख्य कारणे

Subscribe

l१२ वर्षातील सर्वात कमी उष्णता असल्याची नोंद झाली आहे. याचं एक मुख्य कारण लॉकडाऊन आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात गेल्या १२ वर्षांच्या तुलनेत यावेळी उष्णता तितकी प्रभावी नाही. एप्रिलचा शेवटचा दिवस वगळता मार्चच्या ३१ दिवस आणि एप्रिलच्या २९ दिवसांतील तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी होतं. तापमान काही दिवस सामान्य पातळीवर होतं. एप्रिलच्या शेवटच्या दिवशी पारा ४१ अंशांवर गेला होता. आता मे देखील त्याच ट्रॅकवर चालताना दिसत आहे. मेच्या सात पैकी दोन दिवस तापमान सामान्यपेक्षा १ डिग्री खाली होतं. उर्वरित दिवस सरासरीच्या जवळपास किंवा एक डिग्री अधिक होतं. पुढील सात दिवस तापमान सामान्य राहील अशी अपेक्षा आहे.

ही आहेत चार कारणे

१. पश्चिमी विक्षोभ दर १० दिवसांनी सक्रिय होत आहे.
२. बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातील आर्द्रता ढगांमध्ये दिसत आहे.
३. राजस्थानच्या उष्ण वाऱ्याने उष्णता वाढते. या वेळी असं काही घडलेलं नाही.
४. वाहने लॉकडाऊनमध्ये बंद आहेत. यामुळे दिलासा मिळालेला आहे. (हवामानतज्ज्ञ अजय शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार)

- Advertisement -

हेही वाचा – आर्थिक पॅकेजचा फायदा कोणाला? काय म्हणाले, आर्थिक सल्लागार संजीव सान्याल?


लॉकडाऊनचा प्रभाव

१५ मार्चपर्यंत थंड पाऊस : यावेळी १५ मार्चपर्यंत पारा सुमारे ५ अंशांनी कमी राहिला. ढग, पाऊस आणि उत्तरी वाऱ्याने वातावरण थंड होतं. यानंतर हवामानात किंचित सुधारणा झाली, परंतु पारा केवळ ३० अंशांवर पोहोचला.

- Advertisement -

पुढे काय?

डॉ. डी.पी. दुबे यांचं म्हणणं आहे की येत्या पाच दिवसांत कुठे तरी ढगाळ वातावरण असेल आणि कुठे तरी पाऊस पडेल. इंदूरमध्येही ढगाळ वातावरण राहील, वारा असेल. परंतु तापमानात फारसा परिणाम होणार नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -