घरCORONA UPDATECorona: स्पेनमधील ११३ वर्षीय आजीबाईने हरवले कोरोनाला

Corona: स्पेनमधील ११३ वर्षीय आजीबाईने हरवले कोरोनाला

Subscribe

स्पेनमधील सर्वात वयोवृद्ध महिला ही सर्वात जास्त वय असलेली कोरोना रुग्णदेखील बनली. मात्र या ११३ वर्षीय मारिया ब्रानयास या आजीबाईने कोरोनावर मात करत ही लढाई जिंकली आहे. स्पेनमधील ही ज्येष्ठ नागरिका आता कोरोनामुक्त झाली असून हे जगभरातील कोरोनाबाधितांसाठी प्रेरणा देणारे उदाहरण ठरू शकेल. १९०७ साली सॅन फ्रान्सिस्को येथे जन्मलेल्या मारिया याचे बालपण अमेरिकेत गेले. १९१५ साली त्या स्पेनमध्ये परत आल्या. गेल्या २० वर्षांपासून त्या कॅटेलोनिया या वृद्धाश्रमात राहत आहेत. तिथे त्यांनी ४ मार्च २०२० रोजी त्यांचा ११३ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर युरोपमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे मारिया यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटता आले आहे.

- Advertisement -

ज्येष्ठ नागरिक मारिया यांची ट्विटरवरून माहिती

मारिया यांच्या मुलीने त्यांच्यासाठी ट्विटर अकाऊंट ओपन केले होते. त्याच्या माध्यमातून मारिया यांनी २७ मार्च रोजी वृद्धाश्रमातही कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याची माहिती दिली. तेथील कर्मचारी सर्वांची चांगली काळजी घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले. एप्रिल महिन्यात मारिया यादेखी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. जोवर त्यांचा पुढचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येत नाही तोवर त्यांना त्यांच्याच रूममध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. अखेर गेल्या आठवड्यात त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी कोरोनाला हरवल्याची पोस्ट शेअर केली.

स्पेनमधील या ज्येष्ठ महिलेची नोंद जगातील सर्वात वयस्कर कोरोनाबाधित म्हणून झाली आहे. याआधी १०६ वर्षीय कोरोना रुग्ण तर चीनमधील १०३ वर्षीय आजीबाईला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त  समोर आले होते.

- Advertisement -

हेही वाचा –

खबरदार कोरोनाबाबत जगाला माहिती दिली तर…, चीनने WHOला दिली होती धमकी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -