घरक्रीडाआफ्रिदी म्हणतो माझ्या बायोपिकमध्ये आमिर, टॉम क्रूझने काम करावं; नेटकरी म्हणतात, 'पाकिस्तान...

आफ्रिदी म्हणतो माझ्या बायोपिकमध्ये आमिर, टॉम क्रूझने काम करावं; नेटकरी म्हणतात, ‘पाकिस्तान विकावा लागेल’!

Subscribe

पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन शाहिद अफ्रीदी नेहमी त्याच्या स्टेटमेंटमुळे चर्चेत असतो. नुकतेच त्याने जगभरात करोनाच्या तडाख्याने हाहा:कार माजला असताना काश्मीर मुद्द्यावरून भारतीय व्यवस्था आणि पंतप्रधान मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले. याच दरम्यान आणखी एका प्रतिक्रीयेमुळे आफ्रिदीवर नेटकऱ्यांनी चांगलच तोंडसूख घेतलं आहे.

 आफ्रिदीवर बायोपिक

शाहीद आफ्रिदीला त्याच्यावर आधारीत बायोपिकमध्ये कोणाला बघायला आवडेल असा प्रश्न विचारला असता आफ्रिदी म्हणाला की, त्याच्या बायोपिकमध्ये त्याची भुमिका टॉक क्रूजने करायला हवी. तर त्याच्या उर्दू भाषेतील वर्जनमध्ये काम आमिर खानने करावे अशी प्रतिक्रीया दिली. पण भारतीयांना हे काही पटलेलं नाहीये. आफ्रिदीचं हे बोलणं ऐकून नेटकरी मात्र पोट धरून हासले आहेत आणि आफ्रिदीला ट्रोलही केलं आहे.

- Advertisement -

- Advertisement -

आफ्रिदीवर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली. एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘तुम्ही पाकिस्तानला दोनदा विकले तरीसुद्धा आपण आमिर खानची फी भरू शकणार नाही.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, ‘टॉम क्रूझ चित्रपटासाठी पाकिस्तानला विक्री करावी लागली तरीही ते कमी आहे.’ तर एकजण म्हणतो, ‘चित्रपटाचे पहिले दृश्य असे असेल की शाहिद आफ्रिदी फलंदाजीला उतरुन पहिल्याच चेंडूवर बाद झाला. आणि शेवटच्या सीनमध्येही शाहिद आफ्रिदी फलंदाजीला आला होता आणि शून्यावर बाद झाला होता.

भारतीय क्रिकेटर्स आफ्रिदीवर भडकले

काश्मीरी जनतेचा त्रास समजून घेण्यासाठी कोणत्याही विशिष्ट धर्माचा असण्याची गरज नाही. काश्मीर वाचावायला हवे अशा आशयाचे ट्विट शाहिद आफ्रिदी याने केले. त्याचसोबत एका ठिकाणी बोलताना आफ्रिदीने, मोदी हे धर्माचे राजकारण करतात. काश्मीरमधील जनतेला आतापर्यंत दिलेल्या त्रासाबद्दल मोदींना उत्तर द्यावं लागेल, अशीही गरळ ओकली.  यावर भारतीय टीमने त्यांचा चांगला समाचारही घेतला. गौतम गंभीरनंतर फिरकीपटू हरभजनसिंगसुद्धा आफ्रिदीवर भडकला आहे. आपल्या देशाबाबत आणि पंतप्रधानांबद्दल इतक्या खालच्या पातळीवर बोलणं सहन केलं जाणार नाही असा इशाराही हरभजनने दिला. हरभजन सिंग म्हणाला की, मी या देशात जन्माला आलो आणि इथंच शेवटचा श्वास घेणार आहे. देशासाठी 20 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. मी देशाविरोधात काही केलं आहे असं कोणी म्हणू शकत नाही. आज किंवा उद्या जर गरज पडली सीमेवरही जाईन. देशासाठी बंदूक हातात घेईन.


हे ही वाचा – आता मोबाईल घेणे शक्य; Amazon, Flipkart ला रेड झोनमध्ये डिलिव्हरीची परवानगी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -