घरमनोरंजनLockDown: नवाजुद्दीन कुटुंबासह साजरी करणार ईद!, १४ दिवस मायदेशी राहणार क्वारंटाईन

LockDown: नवाजुद्दीन कुटुंबासह साजरी करणार ईद!, १४ दिवस मायदेशी राहणार क्वारंटाईन

Subscribe

मुंबईहून मूळगावी पोहोचताच नवाजुद्दीन सिद्दीकी होम क्वारंटाईन

देशभरात कोरोना व्हायरचा वाढता कहर बघता लॉकडाऊनचा चौथा टप्पादेखील सुरू झाला आहे. अशातच बॉलिवूड विश्वातून एक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे लॉकडाऊन दरम्यान आपल्या कुंटुबासह ईद साजरी करण्यासाठी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या मायदेशी उत्तर प्रदेशातील बुढाना गावी पोहोचल्याचे समजते आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईपासून उत्तर प्रदेशात प्रवास केल्यामुळे नवाजुद्दीन सिद्दीकीला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने आपल्या ट्वीटद्वारे देखील दिली आहे.

- Advertisement -

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, “बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबियांसह ईद साजरी करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या गावी बुढाणा येथे दाखल झाले असून त्यांना तेथे क्वारंटाईन करण्यात आले आहे.” मीडिया रिपोर्टनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकी शुक्रवारी आपल्या कुटुंबासह बुढाणा गावी पोहोचले, तिथे त्यांची पूर्ण तपासणीही करण्यात आली. या कोरोना तपासणीनंतर त्यांच्या सर्वांचेच कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, असे सांगण्यात येत आहे की, नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या कुंटुबासह महाराष्ट्र सरकारच्या परवानगीने खासगी वाहनातून आपल्या गावी पोहोचले.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, नुकताच त्याच्या ‘घुमकेतू’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे, त्याबद्दल अभिनेता नवाजुद्दीन खूप चर्चेत आहे. विनोदी असलेला हा टीझर सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीचा हा चित्रपट २२ मे रोजी जी ५ वर रिलीज होणार आहे.


विराट कोहलीला करायचे आहे, स्वतःच्याच बायोपिकमध्ये काम! कारण…
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -