घरमहाराष्ट्रनाशिककोरोनामुळे गावी आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला

कोरोनामुळे गावी आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला

Subscribe

बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षापासून होता फरार

संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीच्या सात वर्षानंतर मुसक्या आवळण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. पोलिसांनी पांडुरंग यशवंत शेंगाळ (वय ५२, रा. शेंगाळवाडी, संगमनेर) याला अटक करत घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात वर्षापुर्वी २०१३ मध्ये बलात्काराचे एक प्रकरण समोर आले होते. यातील आरोपी पांडुरंग यशवंत शेंगाळ हा घटना घडल्यापासून फरार होता. सध्या सुरु असलेल्या करोनाच्या साथीमुळे गावाकडे घरी आल्याची माहिती नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलिस कर्मचारी सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, आण्णा पवार, भागीनाथ पंचमुख, रवींद्र कर्डीले, संतोष लोंढे, योगेश सातपुते, बा‌ळासाहेब भोपळे यांनी पठार भागातील शेंगाळवाडी परिसरात जाऊन खात्री केली. आरोपी नाव लपवून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी त्याच्या डोंगराळ भागातील आरोपीच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेत घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ग्रामस्थांच्या मदतीने त्याची आेळख पटविण्यात आली असून घटना घडल्यापासून तो फरार होता. पोलिसांना हुलकावणी देणारा आरोपी अखेरिस करोनामुळे सात वर्षानंतर आपल्या गावाकडे परतला आणि पोलिसांच्या हाती सापडला आहे. सात वर्ष तो कोणत्या शहरात लपून बसला होता याचा पोलिस शोध घेत असून पुढील तपास घारगाव पोलिस  करत आहेत.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -