घरCORONA UPDATEचीनच्या TikTok ला टक्कर देणार भारतीय Mitron App

चीनच्या TikTok ला टक्कर देणार भारतीय Mitron App

Subscribe

कोरोना व्हायरसचा उगम चीनच्या वुहान शहरामध्ये झाला असल्याने चीनमधील सर्व वस्तू आणि कंपन्यांवर ग्रहण आले आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा परिणाम चीनी प्रोडक्ट्सवर होताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर चीनने बनवलेल्या अॅपसुद्धा बॅन करण्याच्या मागण्या होत आहे. भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टिकटॉकवर बंदी आणण्याची मागणी होत असून भारताने आता टिकटॉकला पर्याय म्हणून मित्रो अॅप लाँच केले आहे. नुकतेच मित्रो हा व्हिडिओ अॅप नेटिझन्सच्या भेटीला आला असून कमी कालावधीमध्ये त्याने जास्त युजर्स मिळवले आहे. मित्रो हा टिकटॉकला चांगला टक्कर देत असून भारतातून टिकटॉक गायब होण्याच्या मार्गावर आहे.

हेही वाचा – साराच गोंधळ : चुकीची माहिती टाकल्याने मोबाईल ॲपमध्ये दाखवले कोरोना पॉझिटिव्ह

- Advertisement -

महिनाभरात ५० लाख वेळा डाऊनलोड

चीनी अॅप टिकटॉक नेहमीच वादात राहिले आहे. नुकतेच अॅसिड अटॅक सारख्या घटनांमुळे पुन्हा त्यांच्यावर बंदी आणण्याची मागणी होत आहे. अशात मित्रो हे अॅप युजर्समध्ये आपली जागा बनवत आहेत. प्ले स्टोअरच्या माहितीनुसार मित्रो हे भारतीयांमध्ये लोकप्रिय होत असून सध्या सर्वाधिक प्रमाणात डाऊनलोड होणारे अॅप बनले आहे. हे अॅप काही दिवसांपूर्वी प्ले स्टोअरवर आले होते. आतापर्यंत मित्रो अॅप ५० लाख वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. सध्या टिकटॉक अॅपचे रेटिंग सातत्याने कमी होत असून अशावेळी मित्रोने युजर्सचे लक्ष वेधले आहे. टिकटॉक सध्या १.५ रेटिंगवर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -