घरCORONA UPDATE'या' राज्यात कोरोना रूग्ण ४२, तरीही पुन्हा लॉकडाऊन वाढवला!

‘या’ राज्यात कोरोना रूग्ण ४२, तरीही पुन्हा लॉकडाऊन वाढवला!

Subscribe

टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथील करण्यास सुरवात केली असतानाच या सरकारने दोन आठवड्यांचा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात कोरोनाचे मोठं संकट आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात नियम काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. मात्र, दुसरीकडे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव न झालेल्या राज्यांमध्येही करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळेच या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि मिझोराम या दोन राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे

लॉकडाऊन शिथिल केला तरी देशातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढतच जात आहे. अनेक राज्यात आजही कोरोनाच प्रार्दुभाव वाढतच चालला आहे. स्थलांतरित मजूर आणि केंद्र सरकारनं प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर अनेक राज्यात कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले आहेत.  मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. राज्य सरकारनं दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवला असून, क्वारंटाइनचा अवधी २१ दिवस केला आहे.

- Advertisement -

मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांनी सोमवारी जाहीर केले की ९ जूनपासून राज्य दोन आठवड्यांपर्यंत लॉकडाऊन राहील. राज्यांमध्ये कोविड -१ प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी राज्यात कोरोनाव्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या ४२ वर पोहोचली होती,  ती रविवारी केवळ ३४ आणि शनिवारी २४ होती. मिझोरममधील एकूण प्रकरणांपैकी केवळ एका व्यक्ती कोरोनातून मुक्त झाला आहे. आणि इतर ४१ जण सध्या उपचार घेत आहेत. राज्यात विषाणूमुळे एकही मृत्यू झालाले नाही.

- Advertisement -

बाकीच्या देशानेही टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथील करण्यास सुरवात केली असतानाच मिझोराम सरकारने दोन आठवड्यांचा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


हे ही वाचा – एका फोटोग्राफरमुळे गावातील लोकांना झाली कोरोनाची लागण…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -