घरCORONA UPDATEदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोरोनाचा अहवाल आला...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोरोनाचा अहवाल आला…

Subscribe

केजरीवालांना सौम्य ताप आला होता व त्यांचा गळा सुद्धा खराब झाला होता. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोरोना चाचणी अहवाल आला  आहे. त्यामुळे दिल्लीकरांना दिलासा मिळाला आहे. कारण अरविंद केजरीवाल यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. अरविंद केजरीवाल यांना गेल्या दोन दिवसांपासून ताप आणि इतर लक्षणं दिसत असल्यामुळे त्यांनी स्वतःला क्वांरंटाइन करून घेतलं होतं. आज सकाळी त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आता आला असून केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं अहवालातून स्पष्ट झालं आहे.

- Advertisement -

केजरीवालांना सौम्य ताप आला होता व त्यांचा गळा सुद्धा खराब झाला होता. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. आजारी असल्यामुळे केजरीवाल यांच्या सोमवारच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. पण केजरीवाल यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिल्लीकर सोबत राज्य सरकारलाही दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे प्रेस इन्फरमेशन ब्युरोचे महासंचालक आणि केंद्र सरकारचे मुख्य प्रवक्त्यांनाही कोरोनाचा लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय माध्यम केंद्र आगामी 2 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासन आणि प्रशासनाला युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत.

- Advertisement -

दिल्लीत निर्बंध शिथील झाल्यापासून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. दिल्लीत गेल्या दोन-तीन दिवसात कोरोना ची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परप्रांतीयांनी दिल्लीत उपचारासाठी येऊ नये असा आदेश काढला. त्यावरून मोठा वादंग उठला होता. अखेर दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी केजरावाल यांना हा आदेश मागे घ्यायला लावला.


हे ही वाचा – अखेर दिल्ली सरकारची कबुली, कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -