घरCORONA UPDATECorona: दिल्लीतील डॉक्टरांचा सामुहिक राजीनाम्याचा इशारा; वेतन न मिळाल्याने नाराज

Corona: दिल्लीतील डॉक्टरांचा सामुहिक राजीनाम्याचा इशारा; वेतन न मिळाल्याने नाराज

Subscribe

दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून एकूण ३३ हजार रुग्ण संख्या झाली आहे. दरम्यान, कोरोना योद्धा असलेल्या डॉक्टरांनी मात्र कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. दिल्लीतील अनेक हॉस्पिटल्समधील डॉक्टरांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यामध्ये हिंदू राव हॉस्पिटल आणि कस्तुरबा हॉस्पिटलचा समावेश आहे. हिंदू राव हॉस्पिटलचे रेसिडेंट डॉक्टर असोसिएशनच्या आरोग्य प्रमुखांना पत्र लिहून चार महिन्यांपासून वेसन न मिळाल्याचा प्रश्न मांडला आहे. डॉक्टरांनी म्हटले आहे की जर त्यांना वेतन मिळाले नाही, तर ते कामबंद आंदोलन करणार. तसेच १८ जूनपर्यंत वेतन मिळाले नाही तर सर्व डॉक्टर्स मिळून राजीनामा देतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा – Coronavirus: कोरोनाच्या मृत्यूने ४ लाखांचा आकडा ओलांडला; वाचा सर्व आकडेवारी

- Advertisement -

तसेच कस्तुरबा हॉस्पिटलचे रेसिडेंट डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील कुमार यांनी सांगितले की, आम्हालाही गेल्या तीन महिन्यांपासून (मार्च, एप्रिल, मे) महिन्याचे वेतन मिळाले नाही. देशात कोरोना व्हायरसचे संकट असताना ही वेळ आंदोलन करण्याची नाही. त्यामुळे आणि सामुहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मागील २४ तासांत दिल्लीमध्ये १ हजार ५०१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ४८ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. दिल्लीत आतापर्यंत कोरोनामुळे ३२ हजार ८१० लोकं बाधित झाली असून ९८४ जणांचा मृत्यू यामध्ये झाला आहे. अशा परिस्थितीत जर डॉक्टरांनी राजीनाम्याचा बडगा उचलला तर आरोग्य विभागासाठी ही चिंतेची बाब ठरू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -