घरCORONA UPDATEभयानक! दिल्लीत अंत्यसंस्कारांसाठी मृतदेह वेटिंगवर

भयानक! दिल्लीत अंत्यसंस्कारांसाठी मृतदेह वेटिंगवर

Subscribe

दररोज ५० हून अधिक मृतदेह स्मशानभूमी येतात

कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे दिल्लीच्या स्मशानभूमीत मृतदेह वेटिंगवर आहेत. आयटीओ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा अपुरी पडत आहे. तर दुसरीकडे पंजाबी बाग स्मशानभूमीत दिवसभर अंत्यसंस्कार चालू आहेत.

पंजाबीबाग स्मशानभूमीबाहेर भयाण शांतता पसरली आहे. केवळ मृतदेह जळत आहेत. पंजाबीबाग स्मशानभूमीत गुरुवारी दुपारी आठ मृतदेह जळत होते. पाच-सहा मृतदेहांना अग्नि देण्यासाठी तयारी चालू होती. दिल्लीतील पंजाबी बाग स्मशानभूमी कोविड रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी निवडलेली आहे. तिथे दोन सीएनजी भट्ट्या आहेत, तर साठ लाकडी सरण मृतदेह जाळण्यासाठी तयार केले होते. स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याने सांगितलं की येथे दररोज ५० हून अधिक मृतदेह येत आहेत. या स्मशानभूमीच्या बाहेर पीपीई किट्स, ग्लोव्हजचा कचरा पडलेला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘खोटं ही बरोबर बोलू शकत नाहीत’, प्रकाश राज यांनी उडवली शाहांची खिल्ली


मृतदेह दफन करण्यासाठी तीनपट खोल खड्डा

दिल्लीत कोरोना संसर्गामुळे मृतांचा आकडा वाढत आहे. जाजीद स्मशानभूमीच्या व्यवस्थापकीय समितीचे सहाय्यक सचिव मसरुर हसन यांनी सांगितलं की, स्मशानभूमीत आतापर्यंत २३५ मृतदेह दफन केले. ते म्हणाले की मृतदेह दफन करण्यासाठी १५ फूट खड्डा खोदावा लागतो. यासाठी जेसीबीचा वापर केला जात आहे. मृतांचं कुटुंब याची रक्कम देतात.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -