घरताज्या घडामोडीजायखेड्यात कोरोनाचा पहिला बळी

जायखेड्यात कोरोनाचा पहिला बळी

Subscribe

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना बागलाण तालुक्यात सटाणा शहरासह जायखेडा येथे दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जायखेडा शहरात कोरोनाबाधित ३२ वर्षीय वाहनचालकाचा बळी गेला असून जायखेडासह तालुका प्रशासन धास्तावले आहे. या पार्श्वभूमीवर जायखेडा येथील हनुमान चौक परिसरातील ३०० मीटरचा परिसर सील करत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

जायखेडा शहरातील हनुमान चौक भागात कोरोनाबाधित रुग्ण आढल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. रुग्णाच्या निवासस्थानापासून ३०० मीटर परिघात नागरिकांना निर्बंध घालण्यात आले आहेत. जायखेड्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. यावेळी या भागातील नागरिक बाहेर पडू शकणार नाहीत आणि बाहेरील नागरिकांनाही गावात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून तालुक्यात एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, बुधवारी (दि.१०) रुग्णाला रात्री १० वाजेच्या सुमारास वाहनचालकास अचानक त्रास जाणवायला लागला होता. त्यास उपचारार्थ मालेगाव येथे दाखल करण्यात आले होते. त्याचा उपचारावेळी स्वॅब नमुने घेण्यात आले होते. दरम्यान, दुसर्‍या दिवशी सकाळी त्याचा मृत्यू झाला. तो कोरोनाबाधित आढळून आल्याने जायखेडा परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

ग्रामपंचायतीने कडक बंदोबस्त ठेवूनही कोरोनामुक्त जायखेड्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. शुक्रवारी ९(दि.१२) रात्री उशीरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार मालेगाव व बागलाण तालुक्यातील ७१ संशयित रुग्णांचे अहवाल पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये जायखेडा येथील ३२ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तो कोणच्या संपर्कात आला तसेच त्याची ट्रव्हल हिस्ट्री घेतली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -