घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronavirus: जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ९० लाख पार!

Coronavirus: जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ९० लाख पार!

Subscribe

जगातील कोरोना संक्रमणाच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

चीनच्या वुहान शहरात उद्यास आलेल्या कोरोना विषाणूचा कहर सातत्याने वाढताना दिसत आहे. जगभरात ९० लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे दिवसेंदिवस लोकांमध्ये भीतीचे वातावरण वाढत आहे. या जीवघेण्या विषाणूमुळे आतापर्यंत ४ लाख ७० हजाराहून अधिक जणांचा बळी गेला आहे. जगात सर्वाधिक अमेरिका, ब्राझील, ब्रिटन इटली, फ्रान्स, स्पेन या देशांमध्ये कोरोनामुळे लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगात कोरोनाचे ९० लाख ४६ हजार ६७ रुग्ण आढळले असून यापैकी ४ लाख ७० हजार ७०३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत ४६ लाख ३२ हजार ४८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

- Advertisement -

सध्या जगात अमेरिका कोरोना विषाणूचे केंद्रस्थान आहे. आतापर्यंत अमेरिकेत २३ लाख ५६ हजार ६५७ जणांचा कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर यापैकी १ लाख २२ हजार २४७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या एका दिवसात अमेरिकेत २६ हजारांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिकेनंतर ब्राझील हा दुसरा देश आहे. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाख पार झाला असून ५० लाखांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत.

जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित १० देश

अमेरिका : कोरोनाबाधित – २,३५६,६५७ – मृत्यू – १२२,२४७
ब्राझील : कोरोनाबाधित – १,०८६,९९० – मृत्यू – ५०,६५९
रशिया : कोरोनाबाधित – ५८४,६८० – मृत्यू – ९,१११
भारत : कोरोनाबाधित – ४२६,९१० – मृत्यू – १३,७०३
ब्रिटन : कोरोनाबाधित – ३०४,३३१ – मृत्यू – ४२,६३२
पेरू : कोरोनाबाधित – २५४,९३६ – मृत्यू – ८,०४५
स्पेन : कोरोनाबाधित – २४६,२७२ – मृत्यू – २८,३२३
चिली : कोरोनाबाधित – २४२,३५५ – मृत्यू – ४,४७९
इटली : कोरोनाबाधित- २३८,४९९ – मृत्यू – ३४,६३४
इराण : कोरोनाबाधित – २०४,९५२ – मृत्यू – ९,६२३

- Advertisement -

हेही वाचा – ठाणे कारागृहात कोरोनाचा शिरकाव; चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -