घरदेश-विदेशविश्वासघातकी चीनची पुन्हा आगळीक; सीमेवर वाढवलं सैन्य

विश्वासघातकी चीनची पुन्हा आगळीक; सीमेवर वाढवलं सैन्य

Subscribe

पूर्वेकडील दौलत बेग ओल्दी येथे चिनी सैन्य जमवाजमव करत असल्याचं दिसून आलं आहे.

भारत-चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून बोलणी सुरु आहे. मात्र, बोलणी सुरु असताना चीन कट कारस्थान रचतोय. पेनगॉंग सो, गलवान खोरे आणि पूर्व लडाखमधील इतर संघर्षमय भागात चीन सैन्य वाढवत आहे. एलएसीजवळील काही नवीन सॅटेलाईट फोटो समोर येत आहेत. त्यामध्ये एलएसीच्या दोन्ही बाजूंनी चिनी सैन्याचे बंकर दिसत आहेत. त्याचबरोबर चिनी जवान आणि बांधकाम झाल्याचं दिसत आहे.

satelite 1

- Advertisement -

१५ जून रोजी गलवान खोऱ्यामध्ये चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत भारताचे २० सैनिक शहीद झाले होते. या भागातील चिनी चौकी बांधल्यामुळे हा संघर्ष झाला. पण, भारताची कडक भूमिका असूनही, चिनी सैन्याने पुन्हा १४ व्या पेट्रोलिंग पॉईंटवर बांधकाम केलं आहे. शिवाय, पूर्वेकडील दौलत बेग ओल्दी येथे चिनी सैन्य जमवाजमव करत आहे. जून महिन्यात चिनी तळाजवळ छावणी आणि वाहने पाहिलेली आहेत. हे तळ चीनने २०१६ पूर्वी तयार केले होते, परंतु या महिन्यात सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. ग्राउंड ट्रॅकिंगद्वारेही याची पुष्टी केली गेली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -