घरदेश-विदेशगेल्या ६ वर्षांत भाजप, संघाला किती निधी मिळाला?; काँग्रेसचे भाजपला प्रतिप्रश्न

गेल्या ६ वर्षांत भाजप, संघाला किती निधी मिळाला?; काँग्रेसचे भाजपला प्रतिप्रश्न

Subscribe

भाजपच्या जोरदार टीकेनंतर काँग्रेसचा पलटवार

भाजपच्या जोरदार टीकेनंतर काँग्रेसने पलटवार केला आहे. कॉंग्रेसवरील आरोप अर्धसत्य आणि चीन वादापासून विचलित करणारे आहेत. कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, गेल्या सहा वर्षांत त्यांनी परदेशी आर्थिक मदत घेतल्याबाबत भाजप आणि आरएसएस सांगतील काय? घेतल्यास, किती मदत घेतली याबद्दल देखील सांगा. यावेळी त्यांनी भाजपला आणखी बरेच प्रश्न विचारले आहेत.

१) २०११ साली तत्कालीन भाजपाध्यक्ष नितीन गडकरी चीनला का गेले?
२) कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीन आणि आरएसएसमध्ये काय बोलणी झाली?
३) कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीननं आरएसएसच्या शिष्टमंडळाला का बोलावलं होतं?
४) २००९ मध्ये आरएसएसचे लोक चीनमध्ये का गेले होते?
५) भाजप आणि चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे काय संबंध?
६) भाजपला ज्यांच्याकडून देणग्या मिळाल्या, त्यांची नावं जाहीर करणार का?
७) गेल्या ६ वर्षांत भाजप आणि संघाला आंतरराष्ट्रीय संस्थांकडून किती रक्कम मिळाली?
८) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मिळणाऱ्या निधींची यादी सार्वजनिक करणार का?
९) विवेकानंद संस्था आणि इंडिया संस्थेलाही भाजप निधीचा स्त्रोत जाहीर करायला सांगणार का?

- Advertisement -

सध्या भारत-चीन वादावरुन काँग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य केलं आहे. यावर भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज काँग्रेसवर गंभीर आरोप केले. राजीव गांधी फाऊंडेशन आणि चीनचा काय संबंध? फाऊंडेशनचा कारभार आरटीआय अंतर्गत का नाही? पंतप्रधान फंडातून राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे का दिले? अशा प्रश्नांचा भडीमार केला. यावर आता काँग्रेसने पलटवार करत प्रतिप्रश्न केले आहेत.


हेही वाचा – कॉंग्रेस ने देशाला फसवलं म्हणत, जे.पी.नड्डांनी विचारले सोनिया गांधींना ‘हे’ दहा प्रश्न!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -