घरमुंबईमुंबईत १५ जुलैपर्यंत रात्रीची संचारबंदी

मुंबईत १५ जुलैपर्यंत रात्रीची संचारबंदी

Subscribe

मुंबईत पुन्हा रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एकापेक्षा अधिक जण एकत्रित आल्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी सोशल डिस्टनिंगचा फज्जा उडत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एकापेक्षा अधिक जण एकत्रित आल्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

1 ते 15 जुलैपर्यंत मुंबईतील कंटेंटमेंट झोनमध्ये आवश्यक सेवा वगळता लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. दूध, किराणा, भाजीपाला, हॉस्पिटल वगळता इतर दुकाने बंद करण्यात येणार आहेत. रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यत मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याच्या आदेशाचे पत्रक मुंबई पोलिसांनी जारी केले आहे. या संचारबंदीदरम्यान विनाकारण फिरणार्‍या तसेच एकापेक्षा अधिक जण एकत्रित आल्यास त्यांच्यावर कोविड 19-साथीचा रोग कायदा कलम 188, तसेच 144 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी पत्रकात म्हटले आहे.

- Advertisement -

मुंबईत 750 कंटेंटमेंट

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मुंबईतील काही उपनगरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत सध्याच्या घडीला 750 कंटेंटमेंट झोन असून सुमारे 6 हजार इमारती सील केल्या आहेत. कुर्ला एल विभागात सर्वाधिक 96 कंटेंटमेंट झोन आहेत. मुंबई पोलिसांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईतील रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍या वाहन चालकाविरुद्ध कारवाईचा बडगा उचलला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -