घरदेश-विदेशदेशातील बेकायदेशीर 'वेट मार्केट'मधून येऊ शकते नवी महामारी; पेटाचा भारताला इशारा

देशातील बेकायदेशीर ‘वेट मार्केट’मधून येऊ शकते नवी महामारी; पेटाचा भारताला इशारा

Subscribe

A new epidemic could come from the country's illegal 'weight market Peta's warning to India पेटाने केंद्रीय आरोग्य मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय, पशुसंवर्धन मंत्रालय, दुग्ध व मत्स्यव्यवसाय विभाग, भारत सरकार यांनाही अशी बाजारपेठ बंद करण्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे.

जगभरात जनावरांसाठी काम करणार्‍या पेटा या स्वयंसेवी संस्थेने भारताला इशारा दिला आहे. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता देशात सध्या सुरू असलेला ओला बाजार (Wet Markets) त्वरित बंद करावा, अशी मागणी जनावरांसाठी काम करणार्‍या पेटा या स्वयंसेवी संस्थेने भारत सरकारकडे केली आहे. जर ओला बाजार (Wet Markets) बंद केला गेला नाही तर या अवैध ओला बाजारपेठांमुळे (Wet Markets) भारतात एका नवीन साथीच्या रोगाचा धोका निर्माण होईल, अशी भीती संस्थेने व्यक्त केली आहे.

पीपल्स ऑफ द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स (PETA)ने भारतात सध्या सुरू असलेल्या वेट मार्केट्सचे व्हिडीओ फुटेज जाहीर करत म्हटलं आहे की हे बाजार त्वरित बंद केले जावेत. पेटाने म्हटलं आहे की हे बाजार देशातील विविध भागात बेकायदेशीरपणे कार्यरत आहेत. कुत्र्यांचं मांस विकलं जात आहे. त्यांची हत्या केली जात आहे. जे वन्यजीव प्रतिबंध अधिनियम १९७२, प्रिव्हेन्शन ऑफ क्रूलेटी टू अ‍ॅनिमल कायदा १९६० आणि फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स कायदा २००६ चे थेट उल्लंघन आहे, असं पेटाने म्हटलं आहे.

- Advertisement -

दिल्ली, पश्चिम बंगाल, नागालँड आणि मणिपूरमध्येही बाजारपेठा पसरल्या आहेत. सध्या कोविड-१९ साथीचा रोग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचं संस्थेने म्हटलं आहे. चीनमधील वेट मार्केट्समुळे मनुष्यांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली. चीनमधील असे अनेक रोग डुक्कर आणि इतर वन्य प्राण्यांमुळे मानवांमध्ये बर्‍याच वेळा पसरले आहेत. म्हणूनच अशा बाजारपेठा तत्काळ बंद केल्या पाहिजेत.

पेटाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये दिल्लीची गाजीपूर मुर्गा मंडी दाखविली आहे. ज्यात जिवंत खेकडे दिसत आहेत. पश्चिम बंगालच्या मलांछा मार्केटमधील जिवंत ईल्स मासे आणि नागालँडमधील दिमापूरमधील अळी बाजारात कुत्र्याचे मांस विकलं जात आहे. मणिपूरच्या नुटे बाजारात माकड, रानडुकर, हरिण यांचं मांस विकलं जात आहे. अनेक वन्य प्राण्यांचे मांस मणिपूरच्या चौरचंदपूर बाजारातही विकलं जात आहे. या बाजारपेठेत वन्यजीवांविषयी केलेल्या कायद्याचे स्पष्टपणे उल्लंघन केलं आहे. पेटाने केंद्रीय आरोग्य मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय, पशुसंवर्धन मंत्रालय, दुग्ध व मत्स्यव्यवसाय विभाग, भारत सरकार यांनाही अशी बाजारपेठ बंद करण्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – निष्क्रीय मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर पडतच नाही; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -