घरमहाराष्ट्रनाशिकबागलाण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे धरणे आंदोलन

बागलाण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे धरणे आंदोलन

Subscribe

तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन

तुषार रौंदळ : विरगाव
गाव पातळीवर गावाचा विकास साधण्यासाठी महत्त्वाचा दुवा आणि अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मागिल तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालविणे कठीण झाले आहे. या कर्मचाऱ्यांना थकीत असलेला महागाई भत्ता देण्यात यावा आणि चालू आर्थिक वर्षात वेतनासाठी अडथळा ठरत असलेल्या शासन निर्णय रद्द करुन  कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यात याव्या यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे राज्यभर पुकारण्यात आलेल्या आंदोलनात  बागलाण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघातर्फे धरणे आंदोलन शुक्रवारी (दि.१०) छेडण्यात आले. पंचायत समितीच्या आवारात  सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन झाले. त्यानंतर तहसीलदार जितेंद्र इंगळे व गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांना निवेदन देण्यात आले.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव राज्यभर मोठ्या प्रमाणात वाढत असताना गाव पातळीवर शासन व नागरीकांसाठी उत्कृष्ट प्रकारच्या अत्यावश्यक सेवा देऊन महत्त्वाचा दुवा बनलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मागिल तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही.शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पुर्ण वेतन देण्याचा निर्णय दिला असल्याचे समाधान असले तरी  २८एप्रिल २०२०शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायत वसुली व उत्पन्नाची अट घातली असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरमहा ५०टक्के कपात झाली आहे. शासनाने लवकरात लवकर हा कायदा रद्द करुन कर्मचाऱ्यांना थकीत वेतन देऊन, तसेच विविध प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
आंदोलनात संघटनेचे राज्य अध्यक्ष तानाजी ठोंबरे, नामदेव चव्हाण, जिल्हा अध्यक्ष सखाराम दुर्गुडे, बागलाण तालुका अध्यक्ष धरल्या जाधव, सचिव नरेंद्र मोरे, उपाध्यक्ष दीपक अहिरे, उज्ज्वल गांगुर्डे, गणेश म्हात्रे, मिलिंद गणवीर, बबन पाटील, सुधीर टोकेकर, वसंत वाघ, अमृत महाजन, संतोष शिंदे, दादाजी अहिरे, निवृत्ती अहिरे, अशोक अहिरे, हरी शेवाळे, दत्तू चौरे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -