घरCORONA UPDATECorona in India: कोरोनाबाधितांचा आकडा ५७ लाखांपार; आतापर्यंत ९१,१४९ जणांचा मृत्यू

Corona in India: कोरोनाबाधितांचा आकडा ५७ लाखांपार; आतापर्यंत ९१,१४९ जणांचा मृत्यू

Subscribe

दिलासादायक बाब म्हणजे ४६ लाख ७४ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे.

जगभरासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच असून देशाची कोरोना परिस्थिती अद्याप चिंताजनकच आहे. सध्या देशात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या ५७ लाखांपार गेल्याचे समोर आले आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूची लागण झालेल्या ८६ हजार ५०८ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर या काळात १ हजार १२९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत ९१ हजार १४९ जणांचा बळी कोरोनाने घेतल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

 

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत ५७ लाख ३२ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ९ लाख ६६ हजार ३८२ इतके रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे ४६ लाख ७४ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात करून ते बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, देशात कोरोनाचा कहर सुरूच असून दिवसेंदिवस कोरोना चाचण्यांचे प्रमाण देखील वाढल्याचे दिसत आहे. काल दिवसभरात ११ लाख ५६ हजारांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. तर देशात आतापर्यंत ६ कोटी ७४ लाख ३६ हजार ३१ इतक्या कोरोना चाचण्या घेतल्याची माहिती ICMR ने दिली आहे.


फक्त जीवच नाही तर Corona अनेकांच्या नोकऱ्यादेखील हिसकावतोय; जगात ५० कोटी लोकं बेरोजगार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -